Hurun Global Rich List 2025 : अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत

Hurun Global Rich List 2025 : अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत
नवी दिल्ली (प्रतिनिधी) :
मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत ठरले असून त्यांची एकूण संपत्ती तब्बल ९.५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. M3M इंडिया आणि हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी प्रकाशित केलेल्या ‘M3M हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’च्या १४व्या आवृत्तीत ही माहिती जाहीर झाली. गौतम अदाणी आणि कुटुंब ८.१५ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर असून रोशनी नादर मल्होत्रा आणि कुटुंब पहिल्यांदाच २.८४ लाख कोटी रुपयांसह टॉप-३ मध्ये आले आहेत. त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
२०२५ मधील टॉप १० श्रीमंत भारतीयांची यादी:
क्रमांक नाव संपत्ती (कोटी रुपये) संपत्ती बदल (टक्के) कंपनी
१ मुकेश अंबानी आणि कुटुंब ९५५४१० -६ टक्के रिलायन्स इंडस्ट्रीज
२ गौतम अदाणी आणि कुटुंब ८१४७२० -३० टक्के अदाणी
३ रोशनी नादर मल्होत्रा ​​आणि कुटुंब २८४१२० नवीन एन्ट्री एचसीएल
४ सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब २४६४६० -१५ टक्के सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
५ कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब २३२८५० -१ टक्के आदित्य बिर्ला
६ निरज बजाज आणि कुटुंब २३२६८० ४३ टक्के बजाज ग्रुप
७ दिलीप संघवी २३०५६० -८ टक्के सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज
८ अझीम प्रेमजी आणि कुटुंब २२१२५० १६ टक्के विप्रो
९ गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब १८५३१० -४ टक्के हिंदुजा
१० राधाकिशन दमाणी आणि कुटुंब १८२९८० -४ टक्के अव्हेन्यू सुपरमार्ट्स
 नीरज बजाज यांच्या संपत्तीत सर्वाधिक ६९,८७५ कोटी रुपयांची भर पडली आहे. या यादीत पहिल्यांदाच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (१२,४९० कोटी) अब्जाधीशांच्या गटात दाखल झाला आहे. तसेच पेरप्लेक्सिटीचे अरविंद श्रीनिवास (३१ वर्षे) भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले असून त्यांची संपत्ती २१,१९० कोटी आहे. देशातील अब्जाधीशांची संख्या आता ३५० वर पोहोचली असून गेल्या १३ वर्षांत ती तब्बल सहापट वाढल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *