पोलीस ठाणे हद्दीत गुरुवार 18 सप्टेंबर रोजी पहाटे 05:00 वा च्या सुमारास मौजे पिगोंडे गावच्या मोकळया मैदानातुन दोन गुरे इनोव्हा कार मधून अज्ञात चोरटयांनी चोरून नेले होते. त्या चोरांना रसायनी पोलिस ठाण्याच्या मदतीने नागोठणे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.
याबाबत नागोठणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार 18 सप्टेंबर रोजी पहाटे 05:00 वा च्या सुमारास मौजे पिगोंडे गावच्या मोकळया मैदानातुन दोन गुरे इनोव्हा कार मधून चोरून नेल्याची फिर्याद वेलशेत येथील फिर्यादीने दिल्यानंतर नागोठणे पोलिस ठाणेत गुरनं.104/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नागोठणे पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, सहा. फौजदार संदेश सानप, महिला पो.हवा.संजीता सानप, पो. शि. हंबीर यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या मदतीने सदर आरोपीत यांचा तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीने तपास करून आरोपींना 22 सप्टेंबर रोजी रसायनी पोलीस ठाणे कडून ताबा घेऊन अटक करण्यात आले.
सदरील आरोपींना रोहा न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणे कामी तपास चालू आहे. सदरील आरोपींना 10 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून सदर गुन्ह्याचा वेगवान उत्कृष्ट व कौशल्यपूर्ण तपास केल्याने सर्वत्र नागोठणे पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.