१५ ऑगस्टपासून राज्यात FASTag Annual Pass योजना सुरु : ९६ टोलनाक्यांवर सुविधा

१५ ऑगस्टपासून राज्यात FASTag Annual Pass योजना सुरु : ९६ टोलनाक्यांवर सुविधा
मुंबई (मिलिंद माने) : 
केंद्र सरकारने १५ ऑगस्टपासून FASTag Annual Pass योजना सुरु केली असून ही योजना मुख्यतः कार, जीप, व्हॅनसारख्या खाजगी वाहनांसाठी लागू राहणार आहे. जड व्यावसायिक वाहनांचा यात समावेश नसेल.
या योजनेनुसार फक्त ₹3,000 मध्ये एक वर्षासाठी किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात टोल फीमध्ये बचत होईल.
🔹 सामान्यतः महामार्गावर एका फेरीसाठी वाहनाच्या प्रकारानुसार ₹100 ते ₹200 पर्यंत टोल आकारला जातो.
🔹 मात्र या Annual Pass द्वारे एका फेरीचा फक्त ₹15 खर्च होईल.
🔹 राज्यातील ९६ टोलनाके तसेच देशभरातील ११५०+ टोल प्लाझांवर हा पास चालणार आहे.
🔹 हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे यांच्यासाठी लागू असेल. State Highways व पालिकेच्या टोलनाक्यांवर हा पास मान्य राहणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना Highway Travel App वरून पास अॅक्टिव्हेट करता येईल. योजना सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सुमारे ३०,००० वापरकर्त्यांनी एकाच वेळी पास सक्रिय करण्याचा प्रयत्न केला.
* राज्यातील कोणत्या महामार्गावरून वापर करण्यास मान्यता असेल त्या ९६ टोलनाक्यांची संपूर्ण यादी*
१) चारोटी – सुरत-दहिसर
२)खानीवाडे – सुरत-दहिसर बायपास
३)अहमदनगर बायपास – अहमदनगर बायपास
४)तिडगुंडी – सोलापूर-विजापूर
५)तसावडे – सातारा-कागळ
६). किणी – सातारा-कागळ
७) सावळेश्वर – पुणे-सोलापूर
८)वरवडे – पुणे-सोलापूर
९)पाटस – पुणे-सोलापूर
१०). सरडेवाडी – पुणे-सोलापूर
११) आनेवाडी – खंडाळा-सातारा
१२)खेड-शिवपूर – वेस्टर्ली डायव्हर्जन टू पुणे, कात्रज रियललाइनमेंट आणि कात्रज-सारोळे
१३) चांदवड – पिंपळगाव-धुळे
१४ )लालींग – पिंपळगाव-धुळे
१५). बसवंत – पिंपळगाव-नाशिक-गोंडे
१६) घोटी – वडापे-गोंडे
१७) अर्जुनल्ली – वडापे-गोंडे
१८). तामलवाडी – सोलापूर-येडशी
१९) येडशी – सोलापूर-येडशी
२०). धोकी – एंड ऑफ आणे घाट टू स्टार्ट ऑफ अहमदनगर
२१) दुमहरवाडी – माळशेज घाट टू आणे घाट
२२) हिवरगाव पावसा – खेड-सिन्नर
२३) फुलवाडी – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
२४) तळमोड – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
२५) चाळकवाडी – खेड-सिन्नर
२६) वळसांग – अक्कलकोट-सोलापूर
२७). नंदानी – सोलापूर-विजापूर
२८) चाचाडगाव – नाशिक-पेठ
२९) अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
३०). बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
३१). इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
३२)पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
३३) डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
३४). पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
३५). पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
३६). उंडेवाडी – पाटस-बारामती
३७) बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
३८) निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
३९). पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
४०) बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
४१). भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
४२). बडेवाडी – खरवडी कासार-जंक्शन
४३)गोंधखैरी – नागपूर-कोंढळी
४४) करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
४५) निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
४६)नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
४७) कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
४८)तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
४९) उंद्री – खामगाव-चिखली
५०)तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
५१). मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
५२) धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
५३) करोडी – औरंगाबाद-करोडी
५४) हातनूर – करोडी-तेलवाडी
५५) माळीवाडी-भोकरवाडी – येडशी-औरंगाबाद
५६) पादळसिंगी – येडशी-औरंगाबाद
५७)पारगाव – येडशी-औरंगाबाद
५८). वैद्याकीन्ही – मांजरसुम्बा-चुंभळीफाटा
५९). नायगाव – मंठा-पातुर
६०) लोणी – परतूर-माजलगाव
६१). शेंबळ – वरोरा-वणी
६२). हिरापूर – गडचिरोली-मूल
६३)खरबी – नागभीड-आर्मोरी
६४). केलापूर – वडनेर देवधरी केळापूर
६५). हुस्नापूर – यवतमाळ-वर्धा
६६) निअर हळदगाव – वर्धा-बुटीबोरी
६७) वडगाव – कळंब राळेगाव वडकी
६८). उमरेड – कळंब राळेगाव वडकी
६९) सोंगिर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
७०). शिरपूर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
७१) बोरविहीर – बोध्रे-धुळे
७२). दासरखेड – नांदुरा ते चिखली
७३). नाशिराबाद – चिखली ते तारसोड
७४). सुबगव्हाण – तारसोड ते फागणे
७५) दरोडा – बोरखेडी-जाम-वडनेर
७६). नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
७७) बोरखेडी – नागपूर हैदराबाद
७८). पांजरि – नागपूर बायपास
७९)खुमारी – एमपी/एमएच बॉर्डर नागपूर
८०). कामठी कन्हान – कामठी कन्हान बायपास नागपूर
८१)मठानी – नागपूर ते वैनगंगा
८२). सेलू – सावनेर-धापेवाडा-काल्मेश्वर गोंडखैरी
८३) चंपा – नागपूर-उमरेड
८४) भागेमारी – नागपूर-बैतुल
८५)मिलानपूर – नागपूर-बैतुल
८६ )खांबारा – नागपूर-बैतुल
८७) खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
८८). पावनगाव – रिंग रोड नागपूर पॅकेज – २
८९). सेलू अंबा – लोखंडी सावरगाव ते रेणापूर
९०). अष्टा – औसा ते चाकूर
९१). मालेगाव – चाकूर ते लोहा
९२) परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
९३). बिजोरा – वारंगा ते महागाव
९४). आशीव – तुळजापूर ते औसा
९५). सालावा झारोडा – पांगारे ते वारंगा फाटा
९६). भांब राजा – महागाव ते यवतमाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *