स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेने अखंड गडसंवर्धन मोहिमेतून केली गडाची स्वच्छता

Surgad swachhata
कोलाड (श्याम लोखंडे) :
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून २१ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची दुर्ग सुरगड आडोतीस वी मोहिम मोठ्या उत्साहात पार पडली.तर मोहिमेतून गडाची गडदेवता अन्साई माता मंदिर परिसराची साफ सफाई करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजय भोसले आणि सल्लागार विश्वासजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम मोठ्या उत्साहात उपस्थित शिलेदारांनी पार पाडली.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील तसेच रोहा तालुक्यातील सुरगडावर ही मोहीम सर्वत्र सुरू होत असलेल्या नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी अन्साई माता मंदिर परिसरात वाढलेली काटेरी झूडपे, तर गड मार्गावर अतिवृष्ठीमुळे पडलेली झाडे बाजूला करत यांची साफई केली. दसऱ्याच्या निमित्ताने अन्साई माता मंदिरात शस्त्रपुजन केले जाते आणि गडाचे पुजन देखील केले जाते. या कार्यक्रमांसाठी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे शिलेदार पुन्हा नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने गडसंवर्धनासाठी एकत्र आले.

या मोहिमेमधे एकूण 21 शिलेदारांनी सहभाग नोंदवला त्यांची नावे खालील प्रमाणे –
पंकज सावरकर,किशोर सावरकर,अथर्व कापसे, अजय भोसले, सुरज भिसे, सिद्धेश शेलार,योगेश गुजर,ललित जाधव,महेश किर्दत,आदित्य पवार,
विराज तेलंगे, शुभम महाबळे, पियुष चोरगे, मनीष धामणसे, शेयश सावरकर, ललित पवार, प्रथमेश सावरकर,सोहम जावके, हेमंत मालुसरे विश्वास सानप, विशाल पवार ,सुरेश पार्टे आदी शिवरायांच्या विचारांतून घडलेल्या या मावळ्यांनी तसेच शिलेदारांनी माहिमेत सहभागी होऊन या परिसरात संवर्धन करून स्वच्छता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *