ग्रामदैवत जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांच्या मंदिरात सोमवार, २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देवस्थानचे वतनदार पोवळे कुटुंबीयांकडून मातेची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. राजेंद्र मांडेवाल महाराज यांचे दररोज कीर्तन होणार असून, नऊ दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
📜 कार्यक्रमाचा तपशील :
२२ सप्टेंबर (सोमवार): सायं. ३.०० वा. देवीची घटस्थापना.
२३ सप्टेंबर (मंगळवार): सायं. ०४ ते ०६ वा. कुलस्वामिनी प्रासादिक कासु यांचे भजन.
२४ सप्टेंबर (बुधवार): सायं. ०४ ते ०६ वा. स्वामी समर्थ भजन मंडळ, आंबेवाडी यांचे भजन.
२५ सप्टेंबर (गुरुवार): सायं. ०४ ते ०६ वा. स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कुंभार आळी यांचे भजन.
२६ सप्टेंबर (शुक्रवार): दुपारी १२ वा. रुद्रावतार महिला मंडळ यांचा नाच; सायं. ०३ ते ०६ वा. होम मिनिस्टर कार्यक्रम.
२७ सप्टेंबर (शनिवार): सायं. ०३ ते ०६ वा. सखी भजनी मंडळाचा भोंडला व भजन; अशोक भंडारे यांचा संगीत कार्यक्रम.
२८ सप्टेंबर (रविवार): सायं. ०४ ते ०६ वा. श्री दत्तकृपा प्रासादिक मंडळाचे भजन; भोंडला व हळदीकुंकू कार्यक्रम.
२९ सप्टेंबर (सोमवार): सायं. ०४ ते ०६ वा. श्री दुर्गा सप्तशक्ती पाठ.
३० सप्टेंबर (मंगळवार): सायं. ०४ ते ०६ वा. अशोक भंडारी यांच्या कृष्णा गायन पार्टीचा संगीतमय कार्यक्रम.
०१ ऑक्टोबर (बुधवार): सायं. ०४ ते ०६ वा. ओम साई महिला मंडळ, रोहा यांचे भजन.
०२ ऑक्टोबर (गुरुवार): सकाळी १० ते ११ वा. मेघ नीलेश पोटे यांचे वासरी वादन (साथ तबला – पुष्कर महाजन, सर्वेश गूरव); सायं. ०५ ते ०६ वा. “सोने लुटणे” कार्यक्रम; रात्री १०.३० ते १२.३० वा. ललिताचे कीर्तन.
🕉️ दररोजचे कार्यक्रम (२२ सप्टेंबर – ०१ ऑक्टोबर)
सायं. ०६.०० ते ०७.०० वा. संतसेवा मंडळ, नागोठणे – हरिपाठ
सायं. ०७.०० ते ०७.३० वा. आरती
रात्री ०७.४५ ते ०९.०० वा. गरबा नृत्य
रात्री ०९.३० ते ११.३० वा. ह.भ.प. राजेंद्र मांडेवाल महाराज यांचे कीर्तन
उत्सव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत ताडकर व सचिव विवेक देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्ट व उत्सव कमिटी पदाधिकारी, सदस्य अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत.
—————————————-
देवस्थानचे वतनदार पोवळे कुटुंबियांकडून मातेचे विधिवत पूजा व आरती
नागोठण्याच्या जागृत ग्रामदैवत जोगेश्वरी भैरवनाथ देवस्थानचे मानकरी आणि वतनदार गावातील पोवळे कुटुंबीय आहेत. हा मान त्यांच्याकडे वंशपरंपरेने सुरू आहे. देवीचे भक्त आणि देवस्थानचे विश्वस्त मधुकर पोवळे यांच्या हस्ते देवीची पूजा झाल्यानंतर घटस्थापना होते. परंतु मधुकर पोवळे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यमुळे ही परंपरा ज्येष्ठ पत्रकार पोवळे कुटुंबातील राजेश पोवळे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून सुरू ठेवण्यात आली. यावेळी महेंद्र पोवळे, चेतन पोवळे, निलेश पोवळे उपस्थित होते.