चांद्रसेनेय कायस्थ प्रभू समाजाच्या महिला मैत्री ग्रुप आयोजित सिद्धी विनायक मंदिर प्रांगणात रविवार 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 09.30 वाजता महिला व कुमारीकांसाठी सहस्त्र कुंकू मार्चन महासोहळा संपन्न झाली. या महासोहळ्याचे हे तृतीय वर्ष असून या पूजेचा 125 महिला व कुमारिकेने लाभ घेतला.
महिला व कुमारीकांसाठी सहस्त्र कुंकू मार्चन पुजेचा कार्यक्रम करण्यात येत असतो. सदरील पूजा आपल्या घरातील महिला ही अन्नपूर्णा असून ती नेहमीच आपल्या पती,मुलाबाळांसह संपूर्ण कुटूंबासाठी दीर्घायुष्य मिळावे याकरीता नेहमी देवाकडे प्रार्थना करत असते. म्हणुनच सदरील पुजेत अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर सहस्र नामाने कुंकू अर्पण करीत ही पुजा केली जाते. या वर्षी रविवार 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 09.30 वाजता सुरू करण्यात आलेल्या या पूजेचे हे तिसरे वर्ष असून साधारण चार तास चाललेल्या सदरील पूजेमध्ये रोहा, पाली, खोपोली, पनवेल, महाडसह नागोठणे विभागातील 125 महिला व कुमारीकेंनी सहभाग घेतला होता.
या महासोहळ्याचे पौराणित्व रोहा येथील प्रसाद पेडसे गुरुजी व जोशी गुरुजींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पत्की हिने केले असून कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला मैत्री ग्रुपच्या विनया देशपांडे,प्रणिता पत्की,अमिता अधिकारी,शुभदा अधिकारी,मेघा गरुडे, मुग्धा गडकरी,सुखदा वढावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच चां.का. प्रभू समाज बांधव व भगिनी यांनी अपार मेहनत घेतली.
साडे तीन शक्तिपीठांतील देवींच्या मळवटातील कुंकू दिले सहभागी महिलांना भेट – कुंकुमार्चन सोहळ्यासाठी मेघना देशपांडे मलबारी यांनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्रीक्षेत्र कोल्हापूर येथील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, श्रीक्षेत्र तुळजापूरची श्री तुळजा भवानी, वणी गडावरील श्री सप्तश्रुंगी तर रचना काळे चांदवडकर यांनी श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकादेवी या देवतांच्या मळवटाचे आणलेले कुंकू सोहळ्यातील सहभागी महिलांना भेट देण्यात आले.