श्रीवर्धन तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सभासद नोंदणी अभियान

श्रीवर्धन तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सभासद नोंदणी अभियान
बोर्लीपंचतन : 
विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक यांचा धर्मचिकित्साचा वारसा पुढे चालविण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं श्रीवर्धन तालुका सभासद नोंदणी अभियानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सामील होऊन अंनिसचे सभासद व्हावे,असे आवाहन अंनिसच्या सरचिटणीस आरती नाईक यांनी केलं आहे.
गेली ३५ वर्ष महाराष्ट्रात अनेक शाखा, जिल्हा आणि राज्य पातळीवर संबंधित कार्यकारणीच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रचना उपक्रम, प्रबोधन, संघर्ष आणि संघटन अशा पातळीवर काम करत आहे. व्यक्तीच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून समाज विवेकी बनवणे हे अंनिसचे अंतिम ध्येय आहे. अंनिसचा कोणत्याही देवा धर्माला विरोध नसून देवा धर्माच्या नावावर अंधश्रद्धेतून मानसिक, आर्थिक शोषण करणाऱ्या कुप्रवृत्तीला विरोध आहे. महाराष्ट्राला बुद्धिवादी समाजसुधारकांचा दीर्घ वारसा आहे.
ज्यांनी नेहमीच अंधश्रद्धेविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि माहितीपूर्ण भूमिका घेतली. भारतीय संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी म्हणून निश्चित केली आहे. आणि शिक्षणाद्वारे ती रुजवण्याचे मूल्य म्हणून समाविष्ट केले आहे. अंनिसमध्ये काम करण्यासाठी कोणत्याही जाती धर्माची, आस्तिक, नास्तिक अशी कोणतीही अट नाही. भारतीय संविधानावर विश्वास असणारा, समाजाला अंधश्रद्धेच्या बंधनातून मुक्त केलं पाहिजे असं उत्कटतेनं वाटणारा समितीच्या नियमांनुसार स्वयंसेवक म्हणून प्रत्येक जण सहभागी होऊ शकतो. ज्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा किंवा https://forms.gle/7R6avkM6BDRm6Sgz6 या नोंदणी लिंक द्वारे फॉर्म भरुन अंनिसचे सभासद व्हा आणि डोळस व विवेकी समाज निर्मितीच्या वाटचालीत आपला सहभाग नोंदवा.असं नम्र आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.
सभासद नोंदणीसाठी संपर्क
आरती नाईक – ८६५२२२३८०३
लिलाधर खोत – ९४२०३९२१४८
शंकर मयेकर – ९४२०८३७६२१
मकरंद जाधव – ९४२११३८०७९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *