पेण तालुक्यातील शिहु येथिल डॉ. पुरुषोत्तम भोईर यांच्या निवासस्थानी रविवार ( दि.१३) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरीकांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये एकुण ५० नागरीकांनी रक्तदान केल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक चांगले वरदान ठरणार आहे.
रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणी रोहा तालुका मेडीकल असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉ. पुरुषोत्तम भोईर व डॉ.प्रिया भोईर यांच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसादादा भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी रायगड मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांच्यासह डॉ.रोहीदास शेळके, डॉ.सुनिल पाटील, रोहा तालुका अध्यक्ष डॉ.मुकेश सिंग, अलिबाग येथिल शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिपक गोसावी, डॉ.आदित्य शिरसाट, डॉ.हिरामण कोकाटे, के. के. कुथे, दामोदर भोईर, डॉ.अंकिता भोईर, डॉ.अभिषेक शहासने, डॉ.संकेत म्हात्रे, डॉ.प्रथमेश, डॉ.प्रंशात गांगल, डॉ.कुमार ओसवाल, डॉ.दिलीप साबले, डॉ.नरेश सोष्टे, डॉ.हाफिज, डॉ.प्रविण करकरे, डॉ.प्रिया भोईर, डॉ.माधवी पाटील, डॉ.साधना झोलगे, डॉ.अश्विनी कुथे, डॉ. मनिष रायकवार आदि डॉक्टर उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.पुरषोत्तम भोईर, डॉ.प्रिया भोईर, चेतन पोवळे, विशाल दिवकर, अरुण घासे, राहुल ठाकुर, मंदार भोईर, जयराम खाडे, सुहास भोईर, पंकेश भोईर, परमार्थ दवे यांनी अथक परिश्रम घेतले.