पेण तालुक्यात ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर; महिलांसह SC-ST साठी आरक्षित गावे निश्चित

Pen sarpanch arakshan

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत म्हाडा येथील गुरुकुल शाळेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून पारदर्शक पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने चुरस वाढण्याची शक्यता आहे.
या सोडतीत अनुसूचित जातीसाठी एकमेव अंतोरे ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आली असून १४ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. यापैकी खुल्या गटासाठी गागोदे खुर्द, जोहे, काळेश्री, कणे, कळवे, मसद बुद्रुक, दिव, दूरशेत, हमरापुर, आमटेम, वाशी, वढाव, जिते, सोनखार या १४ पैकी सात ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. मागासवर्गीय खुल्या गटासाठी आंबेघर, शेडाशी, वडखळ, मळेघर, बेणसे, खरोशी, कोपर, बोरगाव या आठ ग्रामपंचायती व महिलांसाठी वरवणे, वरेडी, शिर्की, रोडे, रावे, सापोली, बेलवडे बुद्रुक, कामार्ली, जावळी नऊ ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली.
या व्यतिरिक्त, खुला गट कासू, कुहिरे, दादर, बोरी, काराव, निगडे, दुष्मी, बळवली, तरणखोप, करंबेली छत्तीशी, पाबळ, महलमि-या डोंगर, वरसई, मुंढानी, आंबिवली, बोर्झे या सोळा ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला असून जिर्णे, कांदळे, झोतिरपाडा, निधवली, खारपाले, डोलवी, कोलेटी, पाटणोली, कोप्रोली, उंबर्डे, शिहू, सावरसई, करोटी, वाशिवली, वरप, वाकरुळ आदी ग्रामपंचायतींचा महिलांसाठी खुल्या गटात राखीव करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *