माथेरान नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्याने शिवराष्ट्र पॅनेलने आपल्या उमेदवारांची ओळख सुज्ञ मतदारांना करून देण्यासाठी कालपासून प्रचार मोहीम राबविली असून मतदारांकडून या पॅनेलला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश सर्वच नवोदित कार्यक्षम उमेदवारांना आगामी काळात निवडून येण्याची शाश्वती वाटत असून उत्तम प्रकारे काम करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे.
शिवराष्ट्र पॅनेलचे माजी नगराध्यक्ष तथा भावी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे.वयोमान झालेले असताना देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा अजय सावंत यांच्यामध्ये असल्याने दूरवर असणाऱ्या प्रभागात पायी चालत प्रचार सुरू केला आहे. गावाच्या विकासाचे व्हिजन या शिवराष्ट्र पॅनेलच्या सर्वच भावी लोकप्रतिनिधीकडे असल्याने घरोघरी प्रचार करताना सर्वांचेच स्वागत केले जात आहे.
लोकाभिमुख कामे करण्याची क्षमता आगामी काळात याच पॅनेल कडे असल्याचे मतदार बोलून दाखवत आहेत त्यामुळे साहजिकच हे पॅनेल भरघोस मतांनी निवडून सत्ता स्थापन करू शकते असा विश्वास समस्त कार्यकर्त्यांसह नागरिक व्यक्त करीत आहेत. या प्रचार मोहिमेत माजी नगरसेवक नरेश काळे, शकील पटेल, गजानन अबनावे,पवन गडविर, नेहा चव्हाण, रचना सावंत, स्वाती सोनवणे, नजमा शारवान, सोनम दाभेकर,काजल सोनवणे, पेमारे, निधी जाधव यांसह अन्य उपस्थित होते.