शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! किल्ले रायगडावर नवीन प्रवासी व मालवाहू रोपवे उभारण्यास तत्त्वतः मंजुरी!, रायगड रोपवेची मक्तेदारी येणार संपुष्टात

महाड | मिलिंद माने
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर वाढती शिवभक्तांची व पर्यटकांची गर्दी पाहता रायगड रोपवेची क्षमता अपुरी पडत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर नव्याने रोपवे उभारण्याचा प्रस्ताव असून लवकरच किल्ले रायगडावर प्रवासी रोपवे बरोबरच मालवाहू रोपवे उभारणार असल्याचे स्पष्ट झाले असून हा रोपवे बहुदा रायगड वाडी ते टकमक टोक असा असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे
किल्ले रायगडावर असणारा सद्यस्थितीतील रायगड रोपवे हा सन १९९६ सली कैलासवासी विष्णू महेश्वर जोग यांनी शिवभक्तांना व श्री शिव समाधीचे दर्शन सुलभतेने घेता यावे यासाठी हा “रायगड रोपवे “प्रकल्प अस्तित्वात आणला हा रायगड रोपवे प्रकल्प हिरकणी वाडी आणि रायगड परिसरात झाल्याने पर्यटन पूरक व्यवसाय देखील या ठिकाणी चालू झाले त्यामुळे शेकडो कुटुंबांचे कल्याण त्यामुळे झाले अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मात्र उपलब्ध झाला
रायगड रोपवे चालू झाल्यापासून रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत गेली परंतु सुरुवातीला दोन पाळण्यांचाअसणारा रोपवे कालांतराने तीन पाळण्याचा झाला आता तर त्यामध्ये वाढ होऊन चार पाळणे जाताना व चार पाळणे येताना अशी रोपवेच्या पाळण्याची संख्या वाढली त्याचबरोबर रायगड रोपवेचे तिकीट देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वसामान्य शिवभक्तांना तसेच ग्रामीण भागातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना मात्र या तिकिटाचा वाढताखर्च शालेय विद्यार्थ्यांना परवडत नसल्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी रायगड रोपवेने जाण्याऐवजी पायी चालतात जातात मात्र अपंग वृद्ध व्यक्ती तसेच महिलावर्ग व ज्यांना गड चढण्यास त्रास होत आहे असे अनेक जण मात्र रायगड रोपवेने जाणे पसंत करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा किल्ले रायगडावर शिवजयंती शिव पुण्यतिथी शिवराज्याभिषेक सोहळा तसेच मोठ्या प्रमाणावर होणारे शासकीय कार्यक्रम पाहता या ठिकाणी जाणारे राज्यातील मान्यवर मुख्यमंत्री, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच राष्ट्रपती यामुळे रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीत जाणारा रायगड रोपवे हा अपुरा पडत आहे त्यासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर जाणारा नवीन प्रवासी व मालवाहतूक रोपवे उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पाठवला होता अखेर भारतीय पुरातत्त्व विभागाने त्यास तत्वता मंजुरी दिली आहे.
भारत सरकारचे सचिव (संस्कृती) यांनी १९डिसेंबर २०२५ रोजी बोलावलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार रायगड विकास प्राधिकरणाला रायगड किल्ल्यावर प्रवासी व मालवाहतूक सामान वाहून नेण्यासाठी रोपवेचा सविस्तर प्रस्ताव तयार करता यावा यासाठी खालील अटीच्या अधीन राहून तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे
रायगड विकास प्राधिकरण रोपवे साठी एक सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करेल ज्यामध्ये इतर बाबीं बरोबर जमिनीची ओळख आणि इतर सर्व आवश्यक नियोजन तपशिलाचा समावेश असेल पुढील तपासणीसाठी अंतिम मंजुरी करिता हा (डी.पी.आर) या कार्यालयात सादर केला जाईल, प्राधिकरण मुंबई मंडळ अधीक्षक पुरास्तत्व शास्त्रज्ञ आणि प्रादेशिक संचालक (पश्चिम विभाग) यांच्याशी सल्लामसलत करून तळ आणि वरच्या स्थानकासाठी योग्य जागा निश्चित करेल जागा निवडताना प्राधिकरणाने स्मारकाची दृश्य अखंडता अस्सलता आणि एकूण वारसा मूल्य जपले जाईल याची खात्री करावी
रायगडावर नव्याने रोपवे उभारताना प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष (AMASR,) अधिनियम, १९५८ आणि त्या अंतर्गत वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांच्या तरतुदीचे पूर्णपणे पालन करेल
रायगड किल्ल्याचा नुकताच युनोस्कोचा जागतिक वारसा यादी त समावेश झाल्यामुळे प्राधिकरण जागतिक वारसा स्थळांसाठीच्या सर्व लागू असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पालन करेल तसेच (डीपीआर) सोबत वारसा प्रभाव मूल्यांकन आणि आवश्यकतेनुसार पर्यावरण मंजुरीसह सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक मंजुऱ्या देखील जोडल्या पाहिजेत अशी अट रायगड प्राधिकरणाला घालण्यात आली आहे
रुपेशी संबंधित सर्व संरचना उलट सुलट करता येण्याजोग्या आणि कमीत कमी हस्तक्षेप करणाऱ्या असाव्यात तसेच किल्ल्याच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक भूदृशाशी एकरूप होण्यासाठी त्या योग्यरीत्या केल्या जाव्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ( A S I) च्या संवर्धन कार्यासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक आरडीए,( RDA) विना शुल्क केली जाईल तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे रुपये प्रणालीच्या संचालन आणि देखभालीसाठी आवश्यक कौशल्य नसल्यामुळे रोपवे चालवण्याची आणि देखभालीची यंत्रणा भारतीय पुरातत्वl सर्वेक्षण विभागाशी सल्लामसलत करून नियोजित व निश्चित केली जाईल आणि डीपीआर मध्ये स्पष्टपणे ही बाब नमूद केली जाईल.
एकंदरीत आता रायगड किल्ल्यावर रायगड वाडी ते टकमक टोक अशा नवीन रोपे उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय मंजूर्या व रोपे उभारणीचेकाम लवकरच युद्धपातळीवर चालूl होण्याची शक्यता शिवभक्तांकडून वर्तवली जात असून यामुळे नव्या रोपवेमुळे सर्वसामान्य शिवभक्तांना व पर्यटकांना रायगड रोपवेच्या तिकिटाचा दरापेक्षा नव्या रोपवेचे दर हे कमी असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारणता सन २०२७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर रायगड वाडी ते टकमक टोक असा नवीन रोपवेउभा राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.