शालेय विद्यार्थींना मोफत सायकल वाटप

Cycle vatap
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
वरदाइ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे खासदार सुनीलजी तटकरे,महिला व बालकल्याण सभापती अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून समाजातील गरीब शालेय विद्यार्थिनीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे काकळघर व काशीद ग्रामपंचायत हद्दीमधील सुमारे शंभर विद्यार्थिनीसाठी मोफत सायकल वाटप करण्यात आली आहे.
गरीब समाजातील शालेय मुलींना सायकली चे मोफत वाटप करताना मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष फैरोज घलते,रायगड जिल्हा सोशल मिडिया सेल चे जिल्हा उपाध्यक्ष हसमुख जैन, कृषी उत्मपन्न बाजार समितीचे चेअरमन मनोज भगत,सरपच हर्षद महाडीक,माजी सरपंच मनीष नांदगावकर, माजी सभापती बाबू नागावकर, बाबू काबळे, सचिन पाटील,सजय महाडिक आदी मान्यवर यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेत समाजातील गरीब व गरजू विद्यार्थिनी शोधून काढून त्यांना मोफत सायकल प्रदान करण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थिनी यांनी समाधान व्यक्त केले असून पालकांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *