श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास येथील स्वयंभू श्री गंगेश्वर शंकर मंदिराच्या सभागृहाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक १७/१०/२०२६ रोजी महिला व बाल कल्याण मंत्री कु.अदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने व खासदार सुनीलजी तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांचा सहकारने मंजूर झालेल्या १०,००,००० रुपये निधीच्या कामाचे भूमी पूजन गाव अध्यक्ष सौरभ ऋषिकांत शिलकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद सदस्या वासंती मंगेश गुणाजी,श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती सचिन नंदाकर कीर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर,माजी सरपंच आशुतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या भूमिपूजन सोहळ्या मुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेळास गावातील स्वयंभू श्री गंगेश्वर शंकर मंदिर हे ग्रामस्थांचे व आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून,या मंदिराला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.मंदिराच्या जीर्णोद्धारा मुळे मंदिराचे सौंदर्य वाढण्या सोबतच परिसरातील भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा परिसर रमणीय असा आहे.त्यामुळे येथील दुहेरी लाभ नागरिकांना घेता येईल.
मंदिराच्या सभागृहाचे कामामुळे ग्रामस्थ,भाविक आणि देवस्थानाशी संबंधित व्यक्तीं मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावातील धार्मिक परंपरा जपण्याच्या दृष्टीने हा सभामंडप महत्त्वपूर्ण मानला जात आहे.या छोटेखानी कार्यक्रमा निमित्त मूळवेळास गाव अध्यक्ष संदिप दिवेकर,गवळी समाज अध्यक्ष दिपक वाजे,भंडारी समाज अध्यक्ष रणजीत मुरकर,कुणबी समाज अध्यक्ष संकेत मुंडेकर,विजय गणपत शिलकर,प्रकाश दिवेकर,सुदर्शन शिलकर,दिपक पवार,जीवन भाटकर,अरुण शिलधनकर,कल्पेश मुरकर,विजय दिवेकर,पत्रकार संदेश पेडणेकर अशा ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला.