बारामती येथे आज (28 जानेवारी) सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार हे मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी विमानाने येत असताना लँडिंगच्या वेळी विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते बारामतीजवळील एका शेतात कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाचे तुकडे तुकडे झाले असून परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते.
या विमानात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जण प्रवास करत होते. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र काही माध्यमांकडून मृतांची संख्या सहा असल्याचेही सांगितले जात असून, याबाबत सध्या विरोधाभासी माहिती समोर येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना तात्पुरता ब्रेक लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रायगड-पेण दौरा रद्द करण्यात आला असून, एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेलल्या महितीनुसार, हे विमान खाजगी VSR कंपनीचे असल्याची माहिती समोर येत असून विमानात मृत पावलेल्यांची नावे त्याच बरोबर टेक ऑफ टाइमिंग आणि लँडिंग टाइमिंग पुढील प्रमाणे,
एकूण प्रवासी 05 1. उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार 2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक 5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी 08.10 hrs तर बारामती लँडिंग टाइमिंग 08.50 hrs