वाढदिवसाच्या दिवशी पाच मित्रांनी तरुणाला जिवंत पेटवले!

3 members of the same family die in a fire!
मुंबई |
मुंबईतील कुर्ला परिसरात वाढदिवसाचे सेलिब्रेशन दुर्दैवी ठरले आहे. 21 वर्षीय अबुल रहमान मकसूद आलम खान या तरुणाला त्याच्याच पाच मित्रांनी वाढदिवसाच्या रात्री जिवंत पेटवल्याची भीषण घटना घडली. मध्यरात्री केक कापण्यासाठी बोलावून आधी अंडी व दगड फेकून मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पेट्रोल ओतून लायटरने त्याला पेटवण्यात आले. जळत असलेल्या अवस्थेत आरोपी घटनास्थळावरून पळ काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अबुलने दिलेल्या तक्रारीनुसार अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शारीफ शेख या मित्रांनी कट रचून त्याला सोसायटी परिसरात बोलावले होते. केक कापायला सुरुवात होताच सर्वांनी दगड मारण्यास सुरुवात केली आणि नंतर पेट्रोल ओतलं. ‘अरे हे काय करताय’ असे विचारत पळण्याचा प्रयत्न करताच अयाजने लायटरने आग लावल्याचा धक्कादायक खुलासा अबुलने केला आहे.
जिवाच्या आकांताने धावणाऱ्या अबुलने वॉचमनजवळ पाणी मागून प्रथम बाटलीतील पाणी आणि नंतर नळाचे पाणी ओतत मोठ्या प्रयत्नांनी स्वतःचा जीव वाचवला. त्याला पुढे आरोपी हुजैफाच रुग्णालयात घेऊन गेला. गंभीर स्वरूपात भाजलेल्या अबुलवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व पाच आरोपींना अटक करून 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली असून तपास वेगाने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *