लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अखेर दादर सागरी पोलिसांनी केलं गजाआड

लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अखेर दादर सागरी पोलिसांनी केलं गजाआड

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण तालुक्यातील खारपाडा येथे घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अखेर दादर सागरी पोलिसांनी गजाआड केले आहे.
दि. २ ते ९ जून २०२५ दरम्यान फिर्यादी सत्यजित सुरेश वाजपेयी रा.खारपाडा ता.पेण याांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ४ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने आणि रोकड चोरली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित गुड्डू हरेराम सिंग (वय १९) उत्तरप्रदेश सध्या राहणार खारपाडा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून – सोन्याचे मंगळसूत्र (₹३,१५,०००), सोन्याचा नेकलेस (₹९०,०००), पिवळसर धातूचा नेकलेस (₹१,०००), व रोख रक्कम ₹४,२०० – एकूण ₹४,१०,२०० किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही शंभर टक्के यशस्वी मालमत्ता परत मिळविण्याची कामगिरी दादर सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली आहे. यामुळे परिसरात पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पो.नि. संजयकुमार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *