रोहा कोलाड मार्गावर मोटारसायकलला स्कुटीची जोरदार धडक; गाडयांचं मोठं नुकसान, तिघे जखमी      

Accident Kolad
कोलाड  ( श्याम लोखंडे ) :
रोहा  कोलाड मार्गावरील धाटाव गावाच्या हद्दीत दीपक नायट्रेट स्टॉपजवळ मोटार सायकलला स्कुटीची धडक लागुन अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वारांना लहान मोठ्या स्वरुपाचे  दुखापत झाली असून दोन्ही गाडयांचं मोठं  नुकसान झालं आहे.
मंगळवार दि.१८ जुन रोजी रात्रौ ९.३०  वा. दरम्यान फिर्यादी रफिक फरिद शेख, वय २५ वर्षे मुळ रा.लवंगी, ता. मंबळवेढा, जि. सोलापुर सध्या रा. महाबळे चाळ किल्ला, ता. रोहा हे आकाश महाबळे यांचे मो.सा.क्र.एम.एच.०६, सीसी. ०३६८ हीचेवर मागे बसुन रोहा कोलाड रस्त्यावर किल्ला ते धाटाव प्रवास करत होते. त्याचवेळी मोहम्मद सालीद खान, रा.बापुजी गोरे बिल्डींग धाटाव, ता. रोहा याने त्याचे ताब्यातील अॅक्टीवा क्र.एम.एच.०६, एव्ही. १५१४ ही रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अतिवेगाने, हयगयीने चालवुन स्कुटीला इंडीकेटर न देता अचानक कंपनीकडील रस्त्याला जाण्यासाठी वळण घेत असताना मोटार सायकलला स्कुटीची ठोकर लागुन अपघात घडला.
सदरच्या या अपघातातील फिर्यादी रफिक फरिद शेख याला लहान मोठ्या गंभीर व साधे दुखापत झाली असून आकाश महाबळे जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही गाडयांचे मोठे नुकसान  झाले आहे.
याबाबत रोहा पोलीस ठाण्यात  गु.र. नं १३२/२०२४ भादवि कलम  २७९,३३७,३३८ मोवाकाक १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास रोहा पो.नि. मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. ए.ए.म्हात्रे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *