रोहा-कोलाड मार्गावर पाले बु. येथे कारची रिक्षाला जबर धडक, तीन जखमी

रोहा-कोलाड मार्गावर पाले बु. येथे कारची रिक्षाला जबर धडक, तीन जखमी

कोलाड ( श्याम लोखंडे ) :

रोहा कोलाड मार्गावर पाले बु.नजीक रविवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३:१५ वाजता कोलाड कडून पाले बु.कडे जाणाऱ्या रिक्षाला पाले बु. बस स्टॉप समोर रोहा कडून रॉंग साईड येणाऱ्या भरधाव कार ने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून अपघातात तिनजण गंभिर जखमी झाले आहेत.

या विषयी सविस्तर वृत्त असे कि, कोलाड कडून पाले बु कडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षा क्र. एम एच ०६- ३४९४ ही पाले बु बस स्टँड येथे आली असता रोहा कडून रॉंग साईडने येणारी भरधाव कार वाहन चालक सतिश भागोजी सातपुते मु. कोथरुड, पुणे यांच्या ताब्यातील कार क्र.एम. एच.१२ पी.एच ३६०० यांने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात रिक्षा चालक राम धूपकर, प्रवाशी दौलत रघुनाथ जाधव वय ६०, सुमन दौलत जाधव दोन्ही राहणार पाले बु. आदिवासी वाडी येथील यांना लहान मोठया गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असुन त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले असुन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

तर सदर अपघाता विषयी कोलाड पोलिस ठाण्यात रजि. नं.८०/२०२४ बि.एन.एस कलम २८१,१२५मो.वा.का.कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोहवा एम आर गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *