रेल्वेच्या धडकेनं कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

रेल्वेच्या धडकेनं कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !
पनवेल  :
पनवेल तालुक्यातील बम्बई पाडा येथे एका दुर्दैवी घटनेत रेल्वेच्या धडकेने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. श्यामलाल यादव (वय ३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्यामलाल यादव यांना एका अज्ञात रेल्वेने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही घटना परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रेल्वे रुळांजवळ वावरताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *