धुळेवाडी, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या कर्जत येथील मेडिकल मोबाईल युनिट च्या वतीने धुळेवाडी येथील रा. जि.प. शाळेत विद्यार्थ्यांसाठी जागतिक हात धुणे दिनानिमित्त जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेच्या योग्य सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हात धुण्याची कृती करून दाखविण्यात आली. योग्य पद्धतीने हात धुतल्याने जंतूंचा प्रसार रोखण्यास आणि विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळविण्यास मदत होते, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या कर्जत येथील मेडिकल मोबाईल युनिटचे मेडिकल सोसियल वर्कर, केशव कवठे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात हात धुण्याची योग्य सवय रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या जनजागृती सत्रामुळे विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धतीचे महत्त्व समजण्यास मदत झाली.