राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत पेणच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी  

Pen sweenig pattu
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
मंगलुरू (कर्नाटक) येथे अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पेण येथील तीन जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. आरवी तुषार पाटील, हर्षित पराग पाटील आणि हर्ष अनिल म्हात्रे या खेळाडूंनी विविध गटांत उत्कृष्ट वेळ नोंदवत पेण तालुक्याचा मान अभिमानाने उंचावला आहे. 
दरम्यान,  अवघ्या ९ वर्षांच्या आरवी तुषार पाटीलने राष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी करत ५० मीटर ‘सरफेस मोनोफिन्स’ प्रकारात सहावे स्थान पटकावले. तसेच ५० मीटर ‘बाय-फिन्स’ स्पर्धेतही त्याने देशातील अव्वल खेळाडूंना कडवी झुंज देत आपली सर्वोत्तम कामगिरी सादर केली.
११ वर्षीय हर्षित पराग पाटीलने ५० मीटर सरफेस मोनोफिन्स, ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर बाय-फिन्स अशा चारही स्पर्धांमध्ये सहभाग घेत प्रत्येक गटात आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली.
Pen sweemer
१८ वर्षांखालील गटात हर्ष अनिल म्हात्रेने आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत ८०० मीटर बाय-फिन्समध्ये पाचवे आणि ४०० मीटर बाय-फिन्समध्ये सहावे स्थान मिळवले. याशिवाय ५० मीटर ‘ॲप्निया’ आणि १०० मीटर ‘सरफेस मोनोफिन्स’मध्येही त्याने उत्कृष्ट वेळ साधली.
या यशाबद्दल प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे कौतुक केले असून, भविष्यात हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *