गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने रायगड जिल्हासहित राज्याला झोडपले असतानाच, तब्बल १२ दिवस आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे. मात्र मान्सूनने मे महिन्यातच एंट्री घेत जिल्हयात धांगड धिंगा घालायला सुरुवात केली आहे. पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वीज पडून पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.तर जिल्ह्यातील दोनशे हून अधिक घराचे नुकसान झाले आहेत. उरण तालुक्यात एका महिलेसह दोन जण जखमी झाले आहेत.
रायगड किल्ल्याच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. किल्ले रायगड परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागात आज (सोमवार, 26 मे) पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा फटका राजगड जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत अंधार दिसत होता. ढगांचा प्रचंड गडगडाट, रेड अलर्ट खरा ठरला, रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचलाय.
रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला राज्यातील अनेक भागात आज (सोमवार, 26 मे) पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा फटका राजगड जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून खोपोली, म्हसळा, महाड, माथेरान, अलिबाग, रोहा तालुक्यासह इतर भागात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने अनेक भागात रस्त्यावर वृक्ष कोलमडून पडले आहेत.
म्हसळा खामगाव मार्गावर भला मोठा वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे.
रोहा चणेरा मार्गावर देखील भला मोठा वृक्ष कोसळून पडल्याने वाहतूक ठप्प आहे. मुसळधार पावसाचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कर्जत तालुक्यातील बिरदोले गावांमधील दिनांक २६/०५/२०२५ रोजी रोशन कालेकर, वय वर्षे ३० हा युवक शेतामध्ये गेला असता त्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे. तर उरण तालुक्यातील कळंबसुरे येथे दोन जण जखमी झाले आहेत.
अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा राज्यमार्ग येथील महाजने – बेलोशी पूलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नदीतून पर्यायी रस्ता वाहतूकीसाठी केला. मात्र नदीला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. अत्यावश्यक सेवा पोहचण्यास अडथळे निर्माण झाला आहे.
पोलादपूर तालुक्यात रमेश राजाराम शेलार मौजे गोलदरा तालुका पोलादपूर यांच्या पक्क्या घराची संरक्षण भिंत पडून घराचे अंशता नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
म्हसळा तालुक्यातीलबीमौजे वरवठणेकोंड, तालुका म्हसळा येथील सचिन वसंत जंगम यांच्या घराची भिंत व इतर गोष्टीचे कालच्या पावसामुळे नुकसान झाले आहे..
मुरूड तालुक्यातील मिठेखार येथील रमाकात रामचंद्र घागरी यांच्या घराची कौले फुटून नुकसान झाले आहे. काकळघर ग्राम पंचायत हद्दीतील मौजे डाकेली येथे वनिता हरिश्चंद्र घडशी,सुभाष बाळया घडशी यांच्या घराची कौले फुटून नुकसान झाले आहे. तर आगरदांडा येथे बौद्ध वाडी येथे स्मशानभूमी भित पड़ली आहे.तसेच मुरूड नगरपालिका हद्दीतील दत्त वाडी येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता जास्त असून पूर्ण डोंगर खाली खाली येण्याची शक्यता आहे डोंगराखाली वीस कुटुंब राहत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तसेच लक्ष्मीखार भागात पावसाचे पाणी काही घरात शिरले होते, शीघ्र येथे रस्त्यावर पाणी आले होते. तसेच मोरे येथे मातीचा साकव वाहून गेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उरण तालुक्यातील बेलिवाडी आदिवासी व कळंबसुरे येथे जवळपास एकशे पस्तीस घराचे नुकसान झाले आहे.
खालापूर येथील चिंचवली शेकीन येथे असलेले आयटीआय कॉलेज पाण्याने भरले आहे. केलवली स्थानक पाण्याने भरलेले असून लोकल सेवा सुरळीत सुरु आहे. श्रीवर्धन तालुक्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपले आहे.
या जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात पाणीच पाणी झाले आहे. तर रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा प्रवाह थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याचे बोलले जात आहे. हवामान विभागाने वर्तविलेलया अंदाजानुसार आज रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचे आगमन झाल्याचे चित्र आहे. परिणामी कोकण किनारपट्टीसह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी रायगड आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टीवरील इतर भागांत ऑरेंज अलर्ट जारी आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. अलिबागमधील अनेक समुद्रकिनारे रविवार असूनही ओस पडले आहेत.
रायगड जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची मिलिमीटर नोंद
अलिबाग – 78 मुरुड – 371 पेण – 50 पनवेल – 82.4 उरण – 55 कर्जत – 54.6 खालापूर – 62 माथेरान – 181 सुधागड – 104 माणगाव – 63 तळा – 182 महाड – 99 पोलादपूर – 94 श्रीवर्धन – 307 म्हसळा – 300 रोहा – 166 एकूण पाऊस – 2249 एकूण सरासरी झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये 140.56 मी मी