रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं बारा घरांचं नुकसान, तीन जनावरे दगावली

Alibag paus

अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातील पडलेल्या मुसळधार पावसामुळे बारा घरांचे नुकसान तसेच तीन जनावर दगावली असून रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा तळा तालुक्यात १४५ मीमी पाऊस पडल्याची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासन यांच्याकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात आज दिनांक १६जून रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात सरासरी सरासरी पाऊस ७२.१ मिमी. इतका पाऊस पडला असून खालापूर १०८ मिमी., माणगांव-१०४ मिमी., तळा-१४५ मिमी., पोलादपूर १०७ मिमी.इतक्या पावसाची नोंद झाली आहे. इतर सर्व तालुक्यात १०० मिमी. पेक्षा कमी पावसाची नोंद आहे.
सध्या रायगड जिल्ह्यात पाऊस तुरळक प्रमाणात सुरु असून परिस्थिती नियंत्रणात आहे. रायगड पाटबंधारे विभाग यांचेकडील सांय ४.०० च्या अहवालानुसार, रायगड जिल्हयातील सर्व नदया इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहत आहेत.जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या माहितीप्रमाणे जिल्हयातील प्रमुख रस्ते व रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पडलेल्या पावसामुळे मौजे कावळे तर्फे विन्हेरे येथे बाबू नाना झोरे यांच्या घराच्या पडवीचे नुकसान झाले आहे. माणगांव तालुक्यांत १०४ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद झाली असून आठ पक्क्या घराचे अंशतःनुकसान झाले आहे.
तळा तालुक्यातील परीट वाडी तळा येथे संतोष यशवंत तळेकर यांच्या शेडवर झाड पडल्याने शेडचे नुकसान झाले आहे. तळा तालुक्यातील मौजे वाशी महागाव येथील रमेश पांडुरंग टेमकर यांच्या २ बोकड व १ शेळी पावसामुळं गारठल्याने मृत्यूमुखी पडल्या आहेत. तळा तालुक्यात सर्वात जास्त १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली नगर परिषद हद्दीत असणाऱ्या हद्दीतील मौजे भानवज महसूली गावातील काजुवाडी येथील देवकी बाबू पवार यांचे कुडा मातीचे घर पूर्णतःकोसळले. खालापूर तालुक्याते १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील चौल ग्राम पंचायत हद्दीतील मौजे चौल येथील सुरेश बाळाराम घरत यांच्या राहत्या घरावर झाड पडल्याने पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे.
रायगड जिल्ह्यात गत चोवीस तासाच्या कालावधीत पक्क्या ११ घरांचे अंशतः नुकसान झाले तर एका झोपडी पूर्णतः नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *