रायगडच्या युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी; करा अर्ज मिळेल बक्कळ पगार

Jobs
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्त्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” या क्षेत्रात रोजगार मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 5000 युवक-युवतींना संधी देण्यात येणार असून इच्छुकांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अ.मु. पवार यांनी केले आहे.
पात्रतेसाठी उमेदवारांकडे भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त किमान 990 तासांचा कोर्स (OJT सहित) पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मिडवायफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट यामधील प्रशिक्षण पूर्ण केलेले, तसेच जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग/पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे आणि इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे गरजेचे आहे.
या योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया, नियुक्ती वाटप, आरोग्य तपासणी, व्हिसा व पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्रातच मिळणार आहे. मासिक वेतन रु. 1 लाख 61 हजारांपर्यंत, तसेच मेडिकल विमा, निवास व भोजन सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवाय, इस्त्राईलमध्ये नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत पुरविण्यात येईल.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *