मौजे वेळास येथील देवेंद्र सुरसेन भाटकर एसटी महामंडळाच्या वाहक पदावरून सेवानिवृत्त

मौजे वेळास येथील देवेंद्र सुरसेन भाटकर एसटी महामंडळाच्या वाहक पदावरून सेवा निवृत्त
वेळास आगर (संतोष शिलकर) : 
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराची गेली ३७ वर्ष वाहक म्हणून निष्कलंकित आणि अखंडित सेवा केलेले देवेंद्र सुरसेन भाटकर शनिवार दि.३१/५/२०२५ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी सेवा निवृत्त.
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास आगर येथील देवेंद्र भाटकर शांत स्वभाव,अडले नडलेल्या मदत करणारे,कबड्डी हा त्यांचा आवडीचा खेळ,काळभैरव कबड्डी संघ वेळास या संघातून खेळताना अनेक वेळा आपला चमकदार,अष्टपैलू खेळ दाखविणारा एक क्रीडापटू,एका कष्टकरी शेतकरी कुटुंबातील एक सदस्य,१९८८ ते २०२५ अशी ३७ वर्ष निष्कलंकित आणि अखंडित सेवा करून एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले.
श्रीवर्धन आगाराच्या वतीने त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एसटी महामंडळाच्या श्रीवर्धन आगारातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला, तसेच वेळास येथील त्यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या सेवानिवृत्ती प्रति त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जीवन भाटकर,मृदास तोंडलेकर,ऋतुराज शिलकर,सौरभ शिलकर, दिपक पवार,कृष्णा अपराध,संदिप बांद्रे,गणेश बांद्रे,नंदकिशोर भाटकर,सुनील पाटील,भाऊ भाटकर,विद्याधर भाटकर,प्रदिप मुरकर,किसान रहाटे,विश्वास नागवेकर,अभिजीत तोंडलेकर, सुमित पेडणेकर,आशुतोष पाटील,त्याचे कुटुंबीय,सर्व नातेवाईक आणि हितचिंतक मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *