महाड तालुक्यात दरडग्रस्त ७२ गावांवर संकट; प्रशासनाची उदासीनता ग्रामस्थांच्या जीवावर बेतण्याची शक्यता

Darad3
महाड (मिलिंद माने) :
महाड तालुक्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही दरड कोसळण्याचा आणि भूस्खलनाचा धोका कायम आहे. २०२५ सालच्या पावसाळ्यातही ७२ गावे संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यंदा १० मे पासूनच पावसाने जोर धरल्याने धोका अधिक वाढला आहे. मात्र अजूनही शासनाकडून तात्पुरती निवासस्थाने, स्थलांतर व्यवस्था, पूरबचाव यंत्रणा यांसारख्या उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आलेल्या नाहीत.
महाड तालुका डोंगराळ असून ८०% लोकवस्ती दऱ्या-खोऱ्यांमध्ये आहे. १९९५ पासून येथे दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. २००५ मधील महाड दुर्घटना आणि तळीये गावातील दरड दुर्घटना हे त्याचे गंभीर उदाहरण आहे.
📍दरडग्रस्त गावांची यादी
या यादीत महाड तालुक्यात संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत लोअर तुडील, नामावले कोंड, शिंगरकोंड मोरेवाडी, आंबिवली पातेरीवाडी, कोंडीवते मूळ गावठाण, सव, सोनघर, जुई बुद्रुक, चांढवे खुर्द, रोहन, वलंग, कोथेरी जंगमवाडी, माझेरी, पारमाची वाडी, कुंबळे, कोसबी, वामने, चिंभावे बौद्धवाडी, वराठी बौद्धवाडी, चोचिंदे, चोचिंदे कोंड, गोठे बुद्रुक, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, कुर्ला दंड वाडी, रावतळी मानेचीधार, मोहोत सुतारवाडी, मांडले, पिंपळकोंड, मुमुर्शी आंब्याचा कोंड, मुमुर्शी गावठाण, मुमुर्शी बौद्धवाडी, वीर गाव, वीर मराठवाडी, टोळ बुद्रुक, दासगाव भोईवाडा, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, नडगाव काळभैरव नगर, पुनाडेवाडी, पाचाडवाडी, सांदोशी हेटकर कोंड, शेलटोळी, अंबेशिवथर, वाळण बुद्रुक, नाणे माची, कोंडीवते नवीन, हिरकणी वाडी, पाचाड परडी वाडी, वाघेरी आदिवासी वाडी, कोथेरी तांदळेकर वाडी, करंजाडी म्हस्के कोंड, नातोंडी धारेची वाडी, गोंडाळे, खर्डी, पांगारी मनवेधार, वरंध पोकळे वाडी, वरंध बौद्धवाडी, आड्राई, वाळण झोळीचा कोंड,वाळण केतकीचा कोंड, भीवघर, पिंपळवाडी, रुपवली, निगडे, बारसगाव, कोथेरी, ओवळे, खरवली, तळीये आदी ७२ गावांचा समावेश आहे. 
❗ प्रशासनाची तयारी कागदावरच
महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले की, “आपत्ती काळात नागरिकांना शाळा, समाजमंदिर, अंगणवाडी याठिकाणी ठेवण्यात येईल. तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांना गावांमध्येच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” मात्र अनेक ग्रामस्थांच्या मते, प्रत्यक्षात कोणतीच ठोस तयारी झालेली नाही.
⚠ आपत्ती व्यवस्थापन कोलमडले
दारडग्रस्त भागांमध्ये भूस्खलनाची इशारे देणारी कोणतीही यंत्रणा नाही. पावसाळा सुरू झाल्यावर हे उपाय करणे म्हणजे धोका पत्करण्यासारखे आहे. शिवराज्याभिषेकाच्या तयारीत प्रशासन व्यग्र असताना, मान्सूनपूर्व उपाययोजना दुर्लक्षित झाल्या असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *