माथेरान स्टेशनवरील “I LOVE MATHERAN” सेल्फी पॉईंट तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

Matheran selfy point
माथेरान (मुकुंद रांजाणे)
माथेरान रेल्वे स्टेशन परिसरातील लोकप्रिय “I LOVE MATHERAN” सेल्फी पॉईंट काही दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असून यामुळे पर्यटकांच्या आनंदात खंड पडत आहे. या सेल्फी पॉईंटमुळे माथेरानसारख्या दुर्गम पर्यटनस्थळाची ख्याती सर्वदूर पोहोचते. त्यामुळे या ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तरांकडे केली आहे.
नेरळ-माथेरान टॉय ट्रेन व अमनलॉज शटल सेवेच्या वेळापत्रकात शिल्लक असलेल्या वेळेत पर्यटक याच रेल्वे स्टेशन परिसरात परिवार व मित्रमंडळींसह सेल्फी घेताना दिसतात. “I LOVE MATHERAN” सेल्फी पॉईंट हीच त्यांच्यासाठी एक विशेष आकर्षण ठरते. म्हणूनच त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी वाढत आहे.
आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता मिनी ट्रेनच्या वाढीव फेऱ्यांबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, राजेश चौधरी, संदीप कदम यांसह अन्य माथेरानप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *