माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा ८६ वा वर्धापनदिन स्तुत्य उपक्रमांनी साजरा

Matheran patsanstha
माथेरान (मुकुंद रांजणे) : 
माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा ८६ वा वर्धापनदिन दि.२३ जून रोजी पतसंस्थेच्या माध्यमातून लोकोपयोगी स्तुत्य उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पतसंस्थेच्या समोरील जागेत संस्थेच्या अभ्यासू सदस्यांच्या हस्ते एकूण पाच वृक्षांची लागवड करण्यात आली असून या रोपांचे पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून ती जगविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संस्थेचे सचिव योगेश जाधव यांनी सांगितले. 
मुख्य बाजारपेठ मधील एमजी रोडवर पर्यटकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था थ्री चेअरच्या बेंचचे लोकार्पण विद्यमान सभापती अजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 
संस्थेच्या ८६ व्या वर्धापन निमित्ताने श्रीसत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले यावेळी संस्थेचे ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक त्याचप्रमाणे नागरिकांनी पूजेच्या दर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमावेळी सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *