माथेरान नगरपरिषदेच्या वतीने ३९५ वी शिवजयंती मोठया उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे यांच्या हस्ते मुख्याधिकारी इंगळे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांनी शिवकालीन पेहराव परिधान करून जणू काही शिवशाही अवतरली आहे की काय असा भास यावेळी निर्माण झाला होता.
यावेळी मुख्याध्यापक दिलीप अहिरे,शिक्षक लक्ष्मण ढेबे, सचिन भोईर, संतोष चाटसे, अमोल अंधारे , साक्षी कदम, मनिषा चौधरी , किरण शिंदे,शिक्षण समिती पालक संघ अध्यक्षा ज्योती शिंदे, माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील त्याचप्रमाणे नगरपरिषदेचे लेखापाल अंकुश इचके, ज्ञानेश्वर सदगीर, अन्सार महापुळे आदी उपस्थित होते.