माथेरानमध्ये प्रथम नागरिक होण्याचा मान नक्की कुणाला याबाबत चित्र अस्पष्टच; प्रतिष्ठेच्या राजकारणात घोडेबाजाराचा कहर

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती शिवाय विकासाला गती अशक्य - स्थानिकांचे मत
माथेरान | मुकुंद रांजणे 
माथेरान नगरपरिषदेची मिनी विधानसभा निवडणूक समजल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकीत स्थानिक राजकीय मंडळी तर दूरच परंतु तालुक्यातील नेत्यांसाठी एकप्रकारे प्रतिष्ठेचा विषय बनलेली असल्याने ज्याने त्याने आपापल्या परीने पूर्णपणे राजकीय शक्तीचा वापर करून वेळप्रसंगी मतदारांवर दबावतंत्र असावे यासाठी बाहेरील मनुष्यबळ मोठया प्रमाणावर आणण्यात आले होते.
एवढ्याशा या गावात जेमतेम चार हजार मतदार संख्येच्या ठिकाणी एकूण दहा प्रभागात कुठे तीनशे तर कुठे चारशे मतदार असणाऱ्या प्रभागात एक एक मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी इथल्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात घोडेबाजाराला उधाण आल्याने ऐन मंदीच्या काळात नव्वद टक्के मतदारांनी दिवाळी साजरी केली. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी मिळणाऱ्या आर्थिक लाभापायी मतदारांनी सुध्दा सर्वच उमेदवारांना समसमान मते विभागून दिल्याने कुणाच्या पारड्यात मतांचा साठा देण्यात आला आहे.  याबाबत सांगणे कठीण बनले आहे.
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे, तर ज्यांना कधीही उमेदवारी मिळाली नाही अशा मंडळींनी हेतुपुरस्सर भलत्याच उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. मुळात ज्यांना आजतागायत उमेदवारी मिळत नाही त्यांना राजयोग तरी कुठून येणार त्यासाठी त्यांनी काही प्रभागात नेहमीप्रमाणेच नाहक खोडा घालण्यात धन्यता मानली गेली आहे.
अपक्ष उमेदवारांमुळे कार्यक्षम उमेदवाराला कदाचित पराभवाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.मतदारांनी सर्वच प्रभागातील उमेदवारांना समसमान मते दिल्याने सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती मिळणार आहेत आणि या गावाचा प्रथम नागरिक होण्याचा मान कुणाला मिळणार याबाबतचे चित्र अद्यापही  अस्पष्टच दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *