महाड MIDC मध्ये ₹88.92 कोटींचं ड्रग्स जप्त; अजूनही काही कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात

Mahad drugs raid
महाड (मिलिंद माने) : 
महाड औद्योगिक वसाहतीतील . रोहन केमिकल्स कंपनीच्या महाड औद्योगिक वसाहत ठाण्याचे पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹88.92 कोटी किंमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई झाली असली तरी अजूनही काही कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये चर्चिली जात आहे.
महाड औद्योगिक वसाहतीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एमआयडीसीतील प्लॉट नंबर.E.२६/३ या प्लॉटमध्ये रोहन केमिकल कंपनी कार्यरत असून कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला.
या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, याप्रकरणी मच्छिंद्र भोसले राहणार जिते तालुका महाड, सुशांत पाटील राहणार मोहप्रे तालुका महाड, शुभम सुतार राहणार पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व रोहन गवस राहणार ५०१ मार्बल आर्च मित्तल कॉलेज जवळ चिंचोली बंदर मालाड वेस्ट मुंबई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत८(c) २२(c) २५,२७,(a) २९,४२ बी एन एस २०२३ चे कलम३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे.
याबाबत इकबाल चांद का शेख वय वर्ष ३५महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक यांनी याबाबतची खबर दिली असून यामध्ये महाड पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव व त्यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.
महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले असले तरी महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अशाच प्रकारे बेकायदेशीर रित्या रात्रीच्या सुमारास अमली पदार्थ बनवण्याचा धंदा चालत असल्याचे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यातील कामगारांकडून चर्चिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *