महाड शहरातील खड्ड्यांचं साम्राज्य; गणेशोत्सवापूर्वी डागडुजी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

महाड शहरातील खड्ड्यांचं साम्राज्य; गणेशोत्सवापूर्वी डागडुजी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
महाड (मिलिंद माने) :
महाड शहर हे ऐतिहासिक नगरी असून या शहरातील मुख्य रस्त्याविषयी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड्यात अशी अवस्था झाली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर शेती करायची का असा सवाल करीत गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची तातडीने डागबुजी करा असा इशारा महाड शहर मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
महाड शहर हे ऐतिहासिक नगरी असून शहरातील मुख्य रस्त्यांचे अंतर्गत रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वच रस्त्यांवर महाडमध्ये खड्डे पडले या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांसहित रिक्षा चालकांना देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे मागील आठ दिवसांपूर्वी देखील महाड रिक्षा चालक-मालक संघटनेने महाड शहरातील पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करून देखील त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
महाड शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत बोलताना मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे म्हणाले की दस्तुरी नाका परिसर असू द्या नाहीतर महाड एसटी स्टँड चा परिसर असू द्या खूप मोठे मोठे खड्डे पडलेत येणारा जाणारे नागरिक असू द्या शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी असू द्या सगळ्यांची. गैरसोय रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होते मला आपल्या महाड नगरीचे हे ऐतिहासिक नगरीचे मुख्याधिकारी यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पडतातच कसे हे खड्ड्यांची शेती चालू आहे का किंवा हा नक्की ठेकेदार कोण आहे.
या ठेकेदाराने डांबरीकरण करताना यामध्ये डांबर टाकलीच नाही का नक्की ही डांबर खाल्ली कुणी? आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आलेत मी भले भले मोठे खड्डे पडलेत हे तुम्ही बुजवणार कधी? का अशीच फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे आणि परत पावसाळ्या गेल्यानंतर खड्डे भरायचे हे अशी खड्डे ची शेती तुम्ही किती दिवस चालवणार मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचं हे नागरिकांच्या हितासाठी चाललेला आहे हे सगळे खड्डे तुम्ही गणेशोत्सवाच्या आधी भरून दिले नाहीत आणि नागरिक समाधानी झाले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी महाडमध्ये आंदोलन घेण्याचा इशारा देत या आंदोलनाला जबाबदार महाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतील असा इशारा मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *