महाड-रायगड मार्गावरील वरणडोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक एमएच ०६ सीएन ११७० वरून राजेश बापू जाधव (वय २८) हे प्रवास करत होते. त्याचवेळी कार क्रमांक एमएच ०६ सीएल २५८८ चालवत असलेले जयसिंग यादव यांच्या वाहनाशी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेश जाधव यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.