महाड दापोली राज्य मार्गावर अपघाताची मालिका चालूच असून आज सकाळी नऊच्या सुमारास कुर्ला दिवेकर वाडी येथे महाड कडे येणाऱ्या एसटी बसवर महाड कडून दापोली कडे जाणाऱ्या ट्रकने अवघड वळणावर समोरासमोर धडक दिल्याने अपघात घडला यामध्ये एसटी मधून प्रवास करणारे चार जण व टेम्पो चालक असे पाच जण जखमी आहेत.
महाड दापोली राज्य मार्गावर राधाकृष्ण वाडी (मुमुर्शी) महाडMH. २०.BL.३७९५ ही एसटी बस कुर्ला दिवेकर वाडी येथील प्रवासी घेऊन महाड कडे येण्यास निघाले असता महाड कडून दापोली कडे जाणाऱ्या आयशर कंपनीच्या MH. ०६.W.६२१५ या ट्रकने कुर्ला दिवेकर वाडी येथील अवघड वळणावरील उतारात विरुद्ध दिशेने वाहन चालवून एसटीला समोरासमोर धडक दिली यामध्ये एसटी मधून प्रवास करणारे चार प्रवाशांसहित चालक व वाहक यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालक याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला वैद्यकीय उपचारासाठी महाड येथील डॉक्टर रानडे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे१) कुमारी भूमिका बाबुराव कासारे वय वर्षे २१ राहणार कुर्ले तालुका महाड डाव्या गुडघ्याला जखम२) काशीराम विठोबा कुळे वय वर्ष ७७ राहणार करंजाडी डाव्या पायाला जखम३) कुमारी पुष्पा प्रमोद यादव वय वर्ष ४० राहणार कुर्ले तालुका महाड उजव्या हाताला जखम४) कुमारी प्रगती सुदेश कासारे वय वर्ष ते ३० राहणार कुर्ले तालुका महाड छातीला मुकामार या सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यांना प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत एसटी महामंडळाकडून देण्यात आली असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात त्याचे महाडचे आगार प्रमुख रितेश फुलपगारे व ऋतिक चिनके यांनी सांगितले.