महाडमध्ये रोजगार मेळावा; युवकांसाठी मोठी संधी

रायगड |
रायगड जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center Raigad Alibag आणि Veer Murarbaji Deshpande Government Industrial Training Institute Mahad यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल २०२६ रोजी महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची माहिती सहाय्यक आयुक्त अ.मु. पवार यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील विविध रिक्त पदे आणि ॲप्रेंटिसशिप संधींसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनिअर तसेच इतर पदवीधर उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली माहिती अद्ययावत करून “Pandit Dindayal Upadhyay Job Fair” या पर्यायातून आपल्या पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.
या मेळाव्यात केवळ नोकरीच्या संधीच नव्हे, तर नवउद्योजकांसाठी विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती देखील दिली जाणार आहे, ज्यामुळे स्वयंरोजगारासाठी इच्छुकांना मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.