पेण तालुक्यातील अल्पवयीन मुलीची प्रसूती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील चितळकोंड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण वसंत दरोडा (वय २०) याने अल्पवयीन पीडितेशी लग्न केल्याचा दावा करत, तिचे वय कमी व ती संमती देण्यास असमर्थ असल्याचे माहित असूनही तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. या संबंधातून पीडिता गरोदर राहिली आणि १८ एप्रिल २०२६ रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. या प्रकरणात फिर्यादी म्हणून १६ वर्षीय गीता नामदेव निरगुडा हिने तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथून एमएलसी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच पीडितेच्या वयाची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर २७ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मे २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडखळ पोलीस ठाण्याचे अधिकारी सांगळे करत आहेत.