मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण कायम : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण कायम : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षण आजही टिकून आहे आणि यापुढेही ते टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांनी केवळ मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला आणि सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.
शिंदे म्हणाले की,
  • “मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आजही समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळतोय.”
  • कुणबी नोंदीसाठी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना, ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कोर्सेस, अण्णासाहेब विकास महामंडळातून बिनव्याजी कर्ज, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलसाठी भाडे देण्याची योजना अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी झाली आहे.
त्यांनी फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षणाची स्थिती आठवून सांगितलं की, उच्च न्यायालयात आरक्षण टिकले होते, पण सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आलं नाही. “त्या काळात लक्ष द्यायला हवं होतं, दुर्दैवाने ते झालं नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शिंदे यांनी पुन्हा स्पष्ट केलं की,
  • सरकार कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही.
  • “ओबीसींचं आरक्षण कमी करून मराठ्यांना द्यावं अशी मागणी नाही. कुणाचंही आरक्षण कमी करून देणं शक्य नाही.”
  • कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला न्याय देणं हीच सरकारची भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *