मनसे शहराध्यक्ष मारहाण प्रकरणी माजी सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल!

Mahad police thane
महाड |
शहरातील चवदार तळे परिसरात शनिवारी दुपारी मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतच्या सोशल मीडिया वादातून पेटली असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७(२), १८९(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सपना मालुसरे, रोहन भेंडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर, भावड्या सुर्वे, निरज खेडेकर आणि सुनंदा पवार यांचा समावेश आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेनंतर पंकज उमासरे यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मनसेचे वरिष्ठ नेते आज महाडमध्ये दाखल होत असल्याने या घटनेमुळे महाडमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *