मध्यरात्री आंबेत पुलाला ड्रेजर-बार्जची धडक; रायगड–रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद, नुकसानीचा पंचनामा पावसानंतर

महाड | मिलिंद माने 
रायगड वर रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वकांशी आंबेत पुलाला मध्यरात्री खाडीला आलेल्या भरतीमुळे दाभोळ सापे येथील खाडीतून भरकटलेले तीन ड्रेजरने आंबेत पुलाच्या कॉलमला धडक दिली आंबेत खाडीला भरती असल्याने व ड्रेजर व वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज ची उंची जास्त असल्याने त्याची भडक या पुलाला बसली पावसाचे प्रमाण जास्त असल्याने व नेमक पुलाचे कोणत्या भागाचे किती नुकसान झाले आहे याची माहिती पाऊस कमी झाल्यानंतर व धडकलेले ड्रेजर काढल्यानंतरच समजेल असे माणगावचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार लुंगे यांनी सांगितले मात्र सध्या या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
रायगड वर रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत १६फेब्रुवारी १९७८ रोजी तत्कालीन मुख्य अभियंता रामचंद्र त्रिंबक अत्रे यांच्या हस्ते व तत्कालीन अखिल भारतीय अभियंता संस्थेचे अध्यक्ष सिताराम बाळकृष्ण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यानंतर या पुलाला अशाच प्रकारे एका ड्रेजरने धडक दिल्यानंतर पुलाच्या दोन कॉलमला हानी पोचली होती त्यानंतर हा पूल दोन वर्ष वाहतुकीसाठी बंद करून त्याची २७जून २०२१ नंतर दुरुस्ती करून महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन राज्यमंत्री कुमारी आदिती सुनील तटकरे व रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण केले होते.
आज पाच वर्षानंतर पुन्हा एकदा या पुलाला सावित्री खाडीमध्ये दाभोळ सापे येथेनांगरून ठेवलेल्या ड्रेजर व वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज ने पुराच्या पाण्यात वाहून जाऊन आंबेतपुलाला मध्यरात्रीच्या सुमारासधडक दिली. आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज ने धडक दिल्यानंतर ते पुलाला अडकून बसले आहेत कारण भरतीची वेळ व त्यांची उंची जास्त असल्याने ते आता गॅस वेल्डिंगच्या साह्याने कटिंग करीत आहेत त्यामुळे ते काढल्यानंतरच  किती नुकसान झाले आहे याबाबतची माहिती समजेल असे माणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार लुंगे यांनी सांगितले मात्र खबरदारीचा उपाय म्हणून रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग गुन्हा दाखल करणार का?
आंबे पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज ने धडक दिल्यानंतर हे वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज मालकांवर गुन्हा दाखल होतो की राजकीय दबावापोटी थातूर मातुर कारवाई करून हे प्रकरण सामोपचाराने मिटवले जाईल, मात्र पूल कोसळल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यानंतर त्यातील लोकांनी करायचे काय कारण या पुलाचे नवीन बांधकामासाठी हजारो कोटी रुपये खर्च येणार आहे एक तर राज्य सरकार कडे पैसे नसल्याने आधी ठेकेदारांची बिले रखडली आहेत तर नवीन पुलाचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उभा राहणार आहे.