मंत्री भरत गोगावले यांना परत एकदा झटका ! ध्वजारोहणाचा मान मंत्री अदिती तटकरे यांना; जिल्ह्याचा पालक मंत्री नक्की कोण..?

Zenda
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
महाराष्ट्रू राज्यात महायुतीची सत्ता येऊन जवळ पास दहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अजून रायगड जिल्ह्याचा पालक मंत्री कोण आहे असा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र पालक मंत्री पदाची माळ ही महाराष्ट्र शासनाचे रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पडावी अशी इच्छा खुद भरत गोगावले यांच्या सहित आमदार महेंद्र दळवी, महेंद्र यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाची आहे. तर पालकमंत्रीपदी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या विराजमान व्हाव्या अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांची मनापासून आहे. मात्र महायुतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊन सुद्धा रायगड व नाशिक या दोन ठिकाणी पालकमंत्री नसल्याने हे जिल्हे पोरके असलेल्या अवस्थेत आहेत अशी चर्चा देखील सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनानंतर पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे तर नाशिक पालकमत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
रायगड जिल्हा पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच भरत गोगावले समर्थक यांनी जिल्ह्यात आक्रमक होत काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले होते.त्यानंतर दोन दिवसांत रायगड जिल्हा पालकमंत्री पदी झालेली अदिती तटकरे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रजासत्ताक दिनी व महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्याचा मान हा महिला व बाल विकास अदिती तटकरे यांनाच संधी दिली गेली होती.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र येत्या १५ऑगस्ट रोजी रायगडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे करणार झेंडावंदन करणार आहेत. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप सुटला नाही. त्यावर कोणत्याही प्रकारची बैठक होऊन शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये चर्चा झालेली नाही. वाद संपुष्टात आला नसला तरी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ऑगस्ट २०२५ रोजी च्या परिपत्रकानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार झेंडावंदन होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे. याबाबा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत तरीही वाद मिटवण्यात कोणालाही यश आले नाही. आता परिपत्रकानुसार मंत्री अदिती तटकर हे झेंडावंदन करणार असले तरीही अद्याप गोगावले किंवा तटकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र यामुळे पालकमंत्रीपदाची माळ अदिती तटकरेंच्या गळात पडणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
=======================
स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा मान राज्य सरकारने महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना दिला आहे. मात्र रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी भरत गोगावले हेच असतील असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून येत्या काही दिवसांत भरत गोगावले यांचे नाव घोषित होईल.
…आमदार महेंद्र दळवी, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ
———————————————————————–
जिल्ह्यांचे पालकमंत्री / मंत्री /ध्वजारोहण करण्यात येणा-या जिल्ह्याचे नाव
————————————————————————
एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे /ठाणे
अजित आशाताई अनंतराव पवार/बीड
चंद्रशेखर प्रभावतो कृष्णराव बावनकुळे/नागपूर
राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखेपाटील/अहिल्यानगर
छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ/गोंदिया
चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील/सांगली
गिरिश गिता दत्तात्रय महाजन/नाशिक
गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक/पालघर
गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील/जळगांव
दादाजी रेश्माबाई दगडू भूसे/अमरावती
संजय प्रमीला दुलिचंद राठोड/यवतमाळ
उदय स्वरुपा रविंद्र सामंत/रत्नागिरी
जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल/धुळे
पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे/जालना
अतुल लिलावती मोरेश्वर सावे/नांदेड
डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके/चंद्रपूर
शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई/सातारा
अॅड आशिष मिनल बाबाजी शेलार/मुंबई उपनगर
दत्तात्रय गिरीजाबाई विठोचा भरणे/वाशिम
आदिती वरदा सुनिल तटकरे/रायगड
शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले/लातूर
अॅङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे/नंदुरबार
जयकुमार कमल भगवानराव गोरे/सोलापूर
नरहरी सावित्रिबाई सिताराम झिरवाळ/हिंगोली
संजय सुशिला वामन सावकारे/भंडारा
संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट/छत्रपती संभाजीनगर
प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक/धाराशिव
मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)/बुलढाणा
नितेश निलम नारायण राणे/सिंधुदुर्ग
आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर/अकोला
प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर/कोल्हापूर
अँड आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल/गडचिरोली
डॉ. पंकज कांचन राजेश भोयर/वर्धा
मेघना दिपक साकोरे-बोडर्डीकर/परभणी
—————————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *