महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थित सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयात मनीष काळजे व माजी शहर अध्यक्ष मनोज शेजवाल यांच्या मध्ये राडा झाला.
खुद रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यासमोरच होत असलेला राडा पाहून खुद्द मंत्री भरत गोगावले यांच्यासहित उपस्थित शिंदे गटाचे पदाधिकारी यांना आश्चर्याचा धक्का बसला. वेळेचे भान राखून मंत्री गोगावले यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. असल्याची चर्चा सुरू असतानाच विरोधकांकडून मात्र रायगड जिल्हा सहित महाराष्ट्रात खिल्ली उडवली जात आहे.
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे शनिवार दिनाका 19 एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर आले आले होते. अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ते सोलापुरात आले होते. गोगावले यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयास भेट दिली. त्याच ठिकाणी गोगावले यांनी पत्रकार परिषद घेतली. सदर पत्रकार परिषद ही जास्त वेळ सुरू असल्याने पुढील नियोजित कार्यक्रमास विलंब होत होता. शिवसेनेचे एकीकडे हा प्रकार सुरू असताना दुसरीकडे माजी नगरसेवक मनोज शेजवाल, अमोल शिंद, उमेश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले यांची वाट पाहात बसले होते.
इतर पदाधिकारी हे शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले यांची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी माजी शहराध्यक्ष मनोज शेजवाल हे गोगावले अजून कसे येत नाहीत, याची माहिती घेण्यासाठी मनीष काळजे यांच्या कार्यालयाकडे आले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एवढा वेळ हा होतोय, अशी मनोज शेजवाल यांनी विचारणा केली. त्यावर मनीष काळजे यांनी वेळेनुसार दौरा सुरू असल्याचे सांगताच मनोज शेजवाल आणि मनीष काळजे यांच्यात जोरदार राडा झाला. हा राडा मंत्री भरत गोगावले समक्ष झाला. शेजवाल आणि काळजे यांच्यात झालेला राडा पाहून रोहयो मंत्री गोगावले यांच्यासह उपस्थित असणाऱ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.सरते शेवटी भरत गोगावले यांनीच तडजोड करीत करत दोघांना बाजूला केले. त्यानंतरही हे दोघे एकमेकांवर चिखल फेक करीत राहिले.
मनोज शेजवाल आणि मनीष काळजे यांच्यातील वाद मिटवून मंत्री गोगावले हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पोचले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून पुढे निघून गेले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये सोलापूरमध्ये जोरदार राडा झाला.
भरत गोगावले यांच्या दौऱ्याला गालबोट लावण्याचे काम केले आहे. माजी शहरप्रमुख मनोज शेजवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, त्यांनी हा प्रकार केला आहे. ते माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्यात काम करतात. तानाजी सावंत यांनी यापूर्वीच आधी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.आता कोकणातील मंत्र्याने आमच्या जिल्ह्यात येऊन ढवळाढवळ करू नये, असे म्हटले होते. तानाजी सावंत यांच्या हस्तकांनीच गोगावले आलेले असताच त्यांनी जाणूनबाजून हा गोंधळ घातलेला आहे, असे मनीष काळजे यांनी सांगितले.
शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत पकडल्याप्रकरणी मनोज शेजवाळ, समर्थ बिराजदार, सागर सोलापूरे, उमाकांत कारंडे, राजू शिंदे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती बझार पोलिस ठाण्याकडून देण्यात आली आहे.