कर्जत तालुक्यातील भाजपा नेरळ मंडळातील नेरळ व उमरोली जिल्हा परिषद विभाग व माथेरान गिरिस्थान नगरपरिषद विभागातील कार्यकारणी नेरळ भाजपा मंडळ अध्यक्ष नरेश मसणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जाहिर करण्यात आली आहे.
नेरळ चिचंआळी येथील भारतीय जनता पर्टीच्या कार्यालयामध्ये दि. ३१ जुलै २०२५ रोजी नेरळ भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेरळ मंडळ क्षेत्रातील येणाऱ्या नेरळ व उमरोली जिल्हा परिषद विभाग व माथेरान गिरिस्थान नगरपरिषद विभागातील नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारणीमध्ये नेरळ मंडळाचे सरचिटणीस पदी नरेद्र कराळे, उपाध्यक्ष किशोर खंडू ठाकरे, हर्षल कुलकर्णी संभाजी गरूड, रामदास भगत, संतोष धुळे, अनिल जैन, चिटणीस पदावर जयेश ठाकरे, राहुल मुकणे, साधना जाधव, मयुरी मसणे, प्रतिभा घावरे, शुभांगी व्हारे, कोषाध्यक्ष कांता निमणे, नेरळ मंडळ महिला अध्यक्ष नम्रता कांदाळगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश जोशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रेमनाथ पाटील, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष जयदास जाधव, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जावेद जळगावकर, किसान मोर्चा अध्यक्ष शरद श्रीखंडे, तसेच नेरळ जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष धनाजी गरूड, नेरळ पंचायत समिती विभाग अध्यक्ष संतोष शिंगाडे, शेलू पंचायत समिती विभाग अध्यक्ष दिपक शेकटे, उमरोली जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष रामदास तुपे, दहिवली पंचायत समिती विभाग अध्यक्ष प्रल्हाद राणे, उमरोली पंचायत समिती विभाग अध्यक्ष धनंजय थोरवे, सावेळे पंचायत समिती विभाग अध्यक्ष विठ्ठल भागित, पिंपळोली पंचायत समिती विभाग अध्यक्ष गुरुनाथ सोनावळे, तर माथेरान शहर अध्यक्ष पदी प्रविण सकपाळ यांच्यासह विविध आघाडी आणि सेलच्या प्रमुखांच्या नांवे जाहीर करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत नेरळ भाजपा मंडळ अध्यक्ष नरेश मसणे, भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, नितिन कांदाळगावकर, राजेश भगत, आकाश चौधरी, नरेंद्र कराळे, नम्रता कांदाळगावकर आदी मान्यवर पदाधिकारी यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.