भक्तीमय वातावरणात वै. गजानन पद्मा दिघीकर (आबा) यांचे द्वितीय पुण्यस्मरण संपन्न

वेळास आगर | संतोष शिलकर
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचे सुपुत्र आणि महसूल विभागाचे कर्मचारी गजानन पद्मा दिघीकर हे तलाठी म्हणून निवृत्ती झाले होते.ते आबा म्हणून प्रचलित होते.दोन वर्षापूर्वे  हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले होते.
सद्गुरु भक्त वैकुंठवासी गजानन पद्मा दिघीकर यांचे द्वितीय पुण्यस्मरण भक्तीची प्रति पंढरी म्हणून ओळखले जात असलेल्या श्रीक्षेत्र दिघी या गावी मिती चैत्र व १३ शके १९४८ रोजी बुधवार दिनांक. १५/०४/२०२६ रोजी भक्ती भावाने त्या आत्म्याचे स्मरण श्री.गुरु.ह भ.प.पुरुषोत्तम दादा महाराज पाटील,विश्वस्त- संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी श्रीक्षेत्र आळंदी यांच्या शुभ आशिर्वादाने ह.भ.प.श्री.भागवत महाराज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्गुरु महंत यांच्या पावन वाणीने किर्तन रुपी सेवे करिता तुकाराम महाराजांचा अभंग.
क्षणभर आम्ही सोसिले वाईट || साधिले अवीट निज सुख ||
सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची दुःखाची या ||
तुका म्हणे येणे जाणे नाही आता || राहिलो अनंता ची ये पायी ||
या अभंगाद्वारे जन्म मरणा विषयी आपला आणि भगवंताचं नातं काय आहे ? काय सत्य आहे. जीवनात माणसाचा खरा जर मित्र असेल तर तो म्हणजेच मृत्यू आहे.आणि म्हणून माणसाने मृत्यूला कधीही घाबरू नये सदैव पुण्य कर्म करत भगवंताने दिलेले आयुष्य आनंदा मध्ये,सद्गुरुची सेवा,दिनदुखी त्यांचे सेवा,समाजहित,परोपकारी जीवन जगावे.अशा प्रकारचं सुंदर मार्गदर्शन उपस्थित सर्व श्रोते वर्ग यांना केले.
वै. गजानन दिघीकर उर्फ आबा यांचे व्यक्तिमत्व वर्णन करणे शब्द कमी पडतील शासकीय सेवा पूर्ण करून अतिशय प्रामाणिकपणे गोरगरीब जनतेची सेवा, सामाजिक कार्याची आवड,परमेश्वरावर प्रदीर्घ श्रद्धा असल्याने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून किर्तन रुपी सेवेद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करत त्यामुळे समाजातील सर्व लहान थोर मंडळीचे अतिशय प्रिय होते.आबा सर्वांना आपुलकी,जिव्हाळा,स्नेह लावून अचानक सर्वांचा निरोप घेत ईश्वरचरणी लीन झाले.त्या वेळी सबंध दिघी परिसर शोकाकुल वातावरणात न्हाऊन गेला होता.
त्यांच्या पश्चात त्यांचा थोरला मुलगा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्या मुळे सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आज मायबोली चॅनल फेम हरीशजी महाराज म्हणून त्याची ओळख आहे.तोही वडिलां प्रमाणे कीर्तन रुपी सेवेद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य अविरत पणे करत असतो. या पवित्र दिवशी आबांच्या पुण्य आत्म्याचे चिंतन करत समस्त दिघीकर,मेंदाडकर,आप्तेष्ट मित्र मंडळ,अखंड दिघी कोळी समाज बांधव,अखंड वारकरी संप्रदाय दिघी सर्वांनी या पुण्य आत्म्याला ईश्वर उत्तम गती मिळावी म्हणून सर्वांच्या साक्षीने ईश्वरचरणी मंगलमय प्रार्थना करून अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने स्वर्गीय कीर्तनकार गजानन पद्मा दिघीकर यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न.