बोहरा समाजाच्या पुढाकारानं भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन

बोहरा समाजाच्या पुढाकारानं माथेरानमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
माथेरान (मुकुंद रांजाणे) : 
माथेरान या निसर्गरम्य पर्यटनस्थळावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी बोहरा समाजाचे धर्मगुरू सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या आशीर्वादाने २ जून ते ४ जूनपर्यंत मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन बोहरा समाजाच्या मेमोरियल हॉलमध्ये करण्यात आले आहे. मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे बोहरा समाजाचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी हजेरी लावून रुग्णांची मोफत तपासणी व  मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी सातशे पेक्षाही अधिक रुग्णांनी या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
उत्तम प्रकारे नियोजन करत असताना समाजाच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन फॉर्म भरून घेतले होते त्याचप्रमाणे फॉर्म धारकांना फोन करून हजर राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. तर ज्या रुग्णांना चालता येत नाही अशांना व्हीलचेअर मध्ये बसवून आरोग्य कक्षात स्वतः समाजाचे सदस्य ने आण करत होते. विविध आजारांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते.समाजाच्या सर्वच सदस्यांनी येणाऱ्या रुग्णांची काळजी घेत अपेक्षित कक्षापर्यत नेण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
डॉ. शब्बीर सुतरवाला  ( अस्थीरोग तज्ञ),डॉ. शाकिर कपाडिया,डॉ. अवि तुराब चुनिया,डॉ. शब्बीर झवेरी,शल्यचिकित्सक डॉ. हकीम बारोट,डॉ. हुसेन घी वाला,वैद्यकीय औषधी तज्ञ डॉ. अबीजर मंकेड,डॉ. मूर्तजा बागवाला,स्त्री रोग तज्ञ डॉ. निधी चौहान, नेत्र चिकित्सक डॉ.मुस्तफा पारेख,हृदयरोग तज्ञ डॉ.मुस्तफा तस्किन यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी वर्ग मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
माथेरानमध्ये पहिल्यांदाच एवढे भव्य दिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परिसरातील आदिवासी बांधवांनी सुध्दा लाभ घेतला.या भव्य शिबिरात राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी सुध्दा प्रामुख्याने उपस्थिती लावून सर्व सदस्यांचे तसेच आयोजकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *