उन्नती बहुकौशल्यविकास प्रशिक्षण केंद्र झिराड यांच्या पुढाकारानं घेतलेल्या विशेष महिला प्रशिक्षण वर्गाची सांगता

उन्नती बहुकौशल्यविकास प्रशिक्षण केंद्र झिराड यांच्या पुढाकारानं घेतलेल्या विशेष महिला प्रशिक्षण वर्गाची सांगता
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
उन्नती बहुविकास प्रशिक्षण केंद्र झिराड या संस्थेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील विविध गावातील महिलांना आपल्या पायावर उभे राहून आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी विविध प्रकारच्या कला कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना एक प्रकारे मोलाचे सहकार्य करत आहेत. याबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
याच अनुषंगाने उन्नती प्रशिक्षण केंद्र झिराड यांच्या माध्यमातून झिराड येथे महिलांकरीता विशेष प्रशिक्षण सुरू आहे.
मागील संपूर्ण मे महिन्यात महिलांसाठी अँडव्हान्स टेलरिंगच्या आधारावर फेब्रिक पेंटिंग व आर्ट वर्क प्रशिक्षण या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या एक महिन्याच्या कार्यशाळेत अलिबाग तालुक्यातील विविध गावांतील ३० महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सदर प्रशिक्षणात सहभागी झालेल्या व प्रशिक्षण पूर्ण करून कला कौशल्य हस्तगत करणाऱ्या सर्व महिलांना २८ मे २०२५ रोजी झिराड येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वाढत्या जीवनशैली मध्ये विविध हस्तकला शिकणे आवश्यक आहे आणि अशा कला कौशल्य आपल्या परिसरात उन्नती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शिकण्यास मिळत आहेत. याबद्दल प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी संजय नायर फाउंडेशन व उन्नती बहुविकास प्रशिक्षण केंद्राचे आभार मानले आहेत. या महिलांनी कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. सर्वच स्तरातील महिलांनी अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन आपले कौशल्य वाढविण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन उन्नती प्रशिक्षण झिराड केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *