पोलादपूर तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रम

पोलादपूर तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रम
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
तालुक्यात 2005 साली झालेल्या नैसर्गिक आपत्ती काळामध्ये आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सक्रीय झालेल्या श्रमजीवी जनता सहायक मंडळ आणि आदिवासींच्या आर्थिक उत्कर्षासाठी सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी महसूल व वने विभागाच्या सेवा पंधरवडयांअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाड उपविभागीय अधिकारी ओमासे, पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, पुरवठा अधिकारी आबा जगताप, मंडळअधिकारी मंगेश पवार व फुलचंद राठोड, श्रमजीवीचे राम कोळेकर, विठ्ठल कोळेकर, संस्था सचिव अशोक पागे, लेखा परिक्षक राजाराम पाटील, महाड फिल्ड ऑफिसच्या मेधा कदम, विजया पाटेकर, खडपीचे माजी सरपंच दीपक साबळे, आदिवासी कातकरी विकास मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष पांडुरंग वाघे, माजी अध्यक्ष काशिनाथ पवार, चंद्रकांत निकम, सचिव संजय वाघमारे, उपाध्यक्ष शंकर पवार आणि खजिनदार विनायक वाघे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रांताधिकारी ओमासे यांनी, सेवा पंधरवडयाच्या पहिल्या सप्ताहामध्ये पाणंद रस्ते व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचे वाद वगैरेंवर निर्णय झाले असल्याची माहिती देऊन या सप्ताहामध्ये आदिवासी बांधवांच्या लाभाची कामे, घरकुलासाठी 5 ब्रास वाळू देणे तसेच विशेष कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती दिली. आधारकार्ड नसल्याने आदिवासी बांधव अनेक योजनांपासून वंचित राहिले असून सामाजिक संघटना व अशासकीय संस्था व्यक्ती व पत्रकार यांच्या प्रयत्नांतून आदिवासी समाजाला पुढे नेण्याची भूमिका यशस्वी होत असल्याचे सांगितले.
यावेळी तहसिलदार घोरपडे यांनी यापूर्वीच्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमप्रसंगीदेखील आदिवासी समाजाचे जातीचे दाखले, रेशनकार्ड यांचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रकारचे दाखले व रेशनकार्ड वाटप सेवा पंधरवडयानिमित्त करीत असल्याचे सांगितले. पुरवठा अधिकारी आबा जगताप यांनी सेवा पंधरवडयाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
राम कोळेकर यांनी कोयना नदीच्या बुडीत क्षेत्रातील पाच गावांपासून श्रमजीवी संस्थेचे काम सुरू होऊन आज पाच जिल्ह्यांमध्ये वाढले आहे, अशी माहिती दिली. याप्रसंगी संस्था सचिव अशोक पागे, देवपूरचे माजी सरपंच साबळे आणि आदिवासी कातकरी विकास मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग वाघे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया पाटेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *