पेण येथील लाचखोर उपअभियंता ‘संजय जाधव’ ACB जाळ्यात

न्यायालयातून कागदपत्रे मिळवून देण्यासाठी लाच घेणारा शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) पेण मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता संजय जाधव यांनी तक्रारदाराकडे पोल शिफ्टिंगसाठी २५,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १५,००० रुपयांवर आली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
नवी मुंबई लाचलुचपत विभागाने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचत मंगळवार, दिनांक ८ जुलै २०२५ रोजी लाचखोर उपअभियंता संजय जाधव यांना पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई पेण परिसरात करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता असून, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *