नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळील स्क्रीन बोर्ड ‘अपघाताचे आमंत्रण’? नागरिकांचा निषेध

नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळील स्क्रीन बोर्ड ‘अपघाताचे आमंत्रण’? नागरिकांचा निषेध
पनवेल | संजय कदम 
नवीन पनवेलहून पनवेलकडे येणाऱ्या उड्डाणपुलावरून उतरताना डाव्या बाजूला पनवेल महानगरपालिकेने जाहिरातीसाठी लावलेला स्क्रीन बोर्ड वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. उड्डाणपूल आणि स्क्रीन बोर्ड यामध्ये कमी अंतर असल्याने, तसेच उतार असल्यामुळे वाहन चालकांचे लक्ष फलकावर जात असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पनवेल महानगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असताना, महानगरपालिका मात्र शहरभरात स्क्रीन बोर्ड उभारण्याच्या मोहिमेत गुंतली असल्याची टीका केली जात आहे. अद्याप या बोर्डवर जाहिराती सुरू नसल्या तरी, त्यावरील तेजस्वी प्रकाश वाहनचालकांचे लक्ष विचलित करू शकतो, असे नागरिकांचे मत आहे.
सदर ठिकाणी अपघातांची शक्यता लक्षात घेता हा स्क्रीन बोर्ड तात्काळ हटवावा, अशी मागणी पनवेलकर नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून, नागरिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *