अलिबाग तालुक्यातील सांबरीच्या दर्पण पाटीलचे कराटेमध्ये सुवर्ण यश !

अलिबाग तालुक्यातील सांबरीच्या दर्पण पाटीलचे कराटेमध्ये सुवर्ण यश !
पेण | सुदर्शन शेळके 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद रायगड आणि कराटे डॉ ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा 2025-26 नुकतीच पार पडली. ही स्पर्धा अलिबाग तालुक्यातील नेवली येथील क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील सांबरी गावचा दर्पण नितीन पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील दमदार प्रदर्शनामुळे दर्पणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, या विजयामुळे त्याच्या गावात आनंदाचे वातावरण आहे.
दर्पण पाटीलने आतापर्यंत एकूण पाच सुवर्णपदके जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचे वडील नितीन पाटील यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला असून, प्रशिक्षक संतोष कवळे यांच्या मार्गदर्शनामुळेच दर्पणला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *