स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्यानंतर राज्यात निवडणुकीचे वारे जोमाने व्हावे लागले आहे त्यातच राज्यातील नगरपरिषद व नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुल ४ नोव्हेंबरला वाजणार असल्याचे संकेत राजकीय निरीक्षकांकडून प्राप्त होत आहेत.
राज्यातील मागील चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या२४७ नगरपरिषदा, १४७ नगरपंचायती ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या व २९ महानगरपालिका यांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने प्रक्रिया चालू केली असली तरी पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद ,पंचायत समित्यांच्या होणार की नगरपरिषदेच्या व नगरपंचायतीच्या यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर मध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासंदर्भात व कर्ज मुक्तीसाठी आंदोलन केले होते, मात्र या आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्यासाठी समिती स्थापन केली असून या समितीने सहा महिन्यात निर्णय द्यायचा असल्याने कर्जमुक्ती बाबत चा निर्णय सहा महिने आता पुढे जाणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होत आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल हे ४ नोव्हेंबर रोजी वाढणार असल्याचे संकेत राजकीय निरीक्षकांकडून प्राप्त होत आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक ४ नोव्हेंबर रोजी. झाल्यानंतर सायंकाळी राज्य निवडणूक आयोग २४७ नगरपरिषदा व१४७. नगरपंचायत इन संदर्भात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता असल्याने राज्यातल्या ग्रामीण भागात शहरी भागातील सर्वच पक्ष नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.